विम्बल्डन : राफेल नदाल चौथ्या फेरीत | पुढारी

विम्बल्डन : राफेल नदाल चौथ्या फेरीत

लंडन : वृत्तसंस्था : स्पेनचा 22 ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. शनिवारी झालेल्या तिसर्‍या फेरीच्या लढतीत राफेलने 27 वा मानांकित लोरेंजो सोनेगो याच्यावर 6-1, 6-2, 6-4 असा विजय मिळवला. राफेलचा चौथ्या फेरीचा सामना बोटिक वान डी जांड्शुल्प याच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीतील अन्य एका सामन्यात निक किर्गिओसने स्टेफानोस सिसिपास याच्यावर 6-7, 6-4, 6-3, 7-6 असा विजय मिळवला. या सामन्यात दोघांमध्ये खूप शाब्दिक देवाणघेवाण पहायला मिळाली. प्रेक्षकांकडे बघून थुंकल्यामुळे चर्चेत आलेल्या किर्गिओसचा पुढील सामना बँडन नाकाशिमा याच्याशी होईल.

किर्गिओस 2016 नंतर पहिल्यांदाच ऑल इंग्लंड क्‍लबच्या चौथ्या फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता राहिलेल्या सिसिपासने सामन्यानंतर किर्गियोसच्या वर्तनावर टीका केली.

Back to top button