पाँटिंग, गांगुली, धोनीला मागे टाकून विराटचा आणखी एक पराक्रम! | पुढारी

पाँटिंग, गांगुली, धोनीला मागे टाकून विराटचा आणखी एक पराक्रम!

बेंगळूरु : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित पाठोपाठ विराटनेही विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २८७ धावांचे आव्हान पार करताना भारताने दमदार सुरुवात केली. रोहितने आक्रमक फलंदाजी करत आपल्या एकदिवसीय सामन्यातील ९ हजार धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने १८ वी धाव काढत कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यात आपल्या ५ हजार धावा पूर्ण केल्या. 

अधिक वाचा : आणखी एका सलामीवीराने निवड समितीची डोकेदुखी वाढवली!

विराट कोहलीने कर्णधार म्हणून फक्त ५ हजार धावा केल्या नाहीत तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ५ हजार धावा करणारा कर्णधारही ठरला. त्याने ८२ डावात कर्णधार म्हणून एकदिवसीयमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. महेंद्रसिंह धोनाला कर्णधार म्हणून ५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी १२७ डाव लागले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने १३१ डावात ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथने ही कामगिरी १३५ डावात केली होती. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणणा होणाऱ्या सौरभ गांगुलीने यासाठी १३६ डाव घेतले होते. 

अधिक वाचा : रोहित सुसाट, पण विराट अव्वल स्थानी कायम!

अधिक वाचा : ‘धोनीने शब्द पाळला, तो शब्दाचा पक्का’ 

अधिक वाचा : लेखिकेचा विराट – अनुष्कावर अश्लील जोक!

Back to top button