लेखिकेचा विराट – अनुष्कावर अश्लील जोक! | पुढारी

लेखिकेचा विराट - अनुष्कावर अश्लील जोक!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १० विकेट्सनी पराभव झाला होता. या सामन्यात भारताने आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला. काही क्रिकेट जाणकारांनी या बदलामुळेच ऑस्ट्रेलियासमोर भारत २५६ धावांचेच लक्ष ठेऊ शकला होता. त्यानंतर विराटने दुसऱ्या सामन्यात आपल्या नेहमीच्याच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात भारताने ३४० धावांचा डोंगर उभारला. 

विराटच्या याच बॅटिंगच्या पोजिशन बदलण्यावर लेखिका भावना आरोरा यांनी अत्यंत खालच्या शब्दात ट्विट केले. या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भावना अरोरा यांनी ‘अनुष्का शर्मा विराट कोहलीवर चिडली आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवेगळ्या पोजिशन ट्राय करत आहे पण, तिच्याबरोबर नाही #INDvsAUS’ या जोकवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. 

एका नेटकऱ्याने ‘हे विनोदी नाही.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘काकी मुलीला गंगा स्नान करुन आणा. डोक्याची साफसफाई करुन घ्यावी लागेल.’ अशी प्रतिक्रिया दिली. 

Back to top button