पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत आफ्रिकन धावपटूचे दोन्ही गटात वर्चस्व  | पुढारी

पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत आफ्रिकन धावपटूचे दोन्ही गटात वर्चस्व 

मुंबई : क्रीडा प्रतिनिधी

इथिओपियाच्या देरारा हुरिसाने मुंबई मॅरेथॉन एलिट गटात जेतेपद मिळवत चमक दाखवली. हुरिसाने यावेळी चमकदार कामगिरी करत मॅरेथॉनचा सर्वोत्तम वेळ नोंदवत कोर्स रेकॉर्ड ब्रेक केला. त्याने 2:08:09 सेकंद वेळ नोंदवली. 2016 साली गिदोन किपकेटरचा 2:08:35 सेकंदचा विक्रम मोडीत काढला. दुसऱ्या स्थानी इथिओपियाचा आयेले अबशेरो 2:08:20 तर, बिरहानु तेसहोम 2:08:26 सेकंदसह तिसऱ्या स्थानी आला. 

अधिक वाचा : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूचा मृत्‍यू 

महिलांमध्ये इथिओपियाच्या अमाने बेरिसोने 2:24: 51 वेळेसह अव्वल स्थान पटकावले तर, केनियाची रोदाह जेपकोरीर हिने 2:27:14  वेळेसह दुसरे तर, इथिओपियाच्या हावेन हैलूने 2:28:56 वेळेसह तिसरे स्थान पटकावले. भारतीय पुरुष गटात श्रीनू बुगाथाने 2:18:44 सेकंद वेळेसह अव्वल स्थान मिळवले. शेर सिंगने 2:24:00 अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तर, दुर्गबहाद्दूर बुधाने 2:24:03 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले. 

Back to top button