हिटमॅन रोहितने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य! | पुढारी

हिटमॅन रोहितने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य!

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

हिटमॅन रोहित शर्माचे (११९) शतक आणि विराट कोहलीच्या (८९) झंझावाती अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर सात गड्यांनी मात केली. तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने कांगारुंना २८६ धावांत रोखले. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ३००चा टप्पा ओलांडू दिला नाही. या सामन्यात रोहितने १२८ चेंडूत ८ चौकार व सहा षटकार ठोकले. षटकाराच्या आक्रमक खेळीमागचे राज रोहितने चहल टिव्हीवर सांगितले आहे. 

ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर चहल टीव्हीमध्ये  रोहित शर्मा आणि कुलदीप यादव आले. चहलने सुरूवात करताच शिखर धवनने मागील एपिसोडमध्ये केलेल्या मजेशीर वक्तव्याची दखल घेतली आहे. तो म्हणाला, धवनने सांगितले होते की, मी  पुढे आलेले दात आत घेण्यासाठी गेलो आहे. तर अखेर माझे दात आता ठीक झाले आहेत. असे मजेशीर उत्तर देत चहलने रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला. 

दरम्यान, चहलने रोहितला निर्णायक सामन्यादरम्यान केलेली फटाकेबाजीसंदर्भात विचारले. तुम्ही कोणत्याही स्थितीत असताना कसे काय पॉवरसोबत षटकार ठोकता? असा सवाल चहलने केला. यावर रोहित म्हणाला, या गोष्टीत कोणत्याच पॉवरचा संबंध नाही. षटकार मारण्यासाठी टेक्निकची गरज असते. मी नेहमी म्हणतो असतो की, षटकार ठोकने ही पॉवरची गोष्ट नाही तर वेळेची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे चांगला वेळ असेल तर चेंडू आपोआपच षटकाराकडे खेचला जातो. आमची बॅटिंग इतकी चांगली आहे की षटकार स्वतःहून निघतो. 

तसेच रोहित पुढे म्हणाला, चेंडू उंच मारायचा आहे की बाहेर मारायचा याचा मी कधीच विचार करत नाही. माझे लक्ष्य केवळ रोपकडे असते. त्यामध्ये केवळ ६ धावा उपलब्ध आहेत. त्यामुळे ८ धावा काय मिळणार नाहीत? असा मजेशीर सवालदेखील रोहितने यावेळी केला आहे. 

Back to top button