विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी | पुढारी

विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी सवांद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशातून शिकले पाहिजे असा सल्ला देत भारतीय खेळाडूंचे दाखले दिले. परिक्षा पे चर्चे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचीही उदाहरणे दिली. 

हेही वाचातंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलामही बनू नका; पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

यावेळी मोदी म्हणाले, २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी सांमन्यात फलंदाजी करताना चेंडू जबड्यावर लागल्याने जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानात उतरला आणि लाराची विकेट घेतली होती. त्या क्षणाची आठवण विद्यार्थ्यांना करुन देत मोदींनी सांगितले की, अनिल कुंबळे त्या सामन्यात जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. तो खेळला नसता तरी त्याला कोणी काहीही बोलले नसते. पण तो खेळला आणि सामना जिंकून दिला. तुम्ही तुमच्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जाता यावर सर्व काही अवलंबून असते. 

हेही वाचा►‘विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये’

 

तसेच, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचीही उदाहरण दिले. आपला संघ पिछाडीवर होता. पण राहुल द्रविड आणि व्हीव्हीएल लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने सामन्याला कशी कलाटनी दिली ते आपण विसरु शकत नाही. सकारात्मक विचार आणि प्रेरणेची ही शक्ती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

हेही वाचा►चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड’

आज झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाच विषयांवरील निबंधांच्या माध्यमातून १०५० विद्यार्थ्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.

Back to top button