मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर धावला ऑस्ट्रेलियाच्या मदतीला; दिसणार वेगळ्या भूमिकेत | पुढारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर धावला ऑस्ट्रेलियाच्या मदतीला; दिसणार वेगळ्या भूमिकेत

नवि दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे, पण आता त्यांना आणखी एका नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आगीने नेस्तानाबूत झालेले  शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी “बुशफायर रिलीफ मॅच” सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श हे दोघे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास ४.९ कोटी रक्कम जमा केले आहे. इतकेच नव्हे तर वॉर्न आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. तो सामना म्हणजे “बुशफायर रिलीफ मॅच”.

मदतीसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यासाठी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा महान माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श सज्ज आहे. मात्र, दोघेही दिग्गज यंदा बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळताना नाही तर एका वेगळ्याच भूमिकेत दिसतील. सचिन आणि वॉल्श अनुक्रमे पॉन्टिंग इलेव्हन आणि वॉर्न इलेव्हनच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहेज. हा सामना ८ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सचिन सोबत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाही बोलावण्यात आले आहे. 

स्वयंसेवक, अग्निशमन दलाच्या आणि आपत्कालीन सेवांच्या सुरु असलेल्या आणि अविश्वसनीय कार्याचा विचार करून, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कॉमनवेल्थ बँक महिला तिरंगी मालिका टी-20, त्यानंतर बुशफायर क्रिकेट बॅश आणि केएफसी बिग बॅश फायनल असे तीन सामने खेळले जाणार आहेत.

पॉन्टिंग, वॉर्न, जस्टीन लँगर, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉटसन, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल आणि मायकेल क्लार्क यांच्या दिग्गज कलागुणांना तेंडुलकर आणि वॉल्श प्रशिक्षण देताना पाहायला मिळणार आहे. पुढील पंधरवड्यात आणखी खेळाडू जाहीर होणार आहेत. या सामन्यातून कमावलेला सर्व निधी ऑस्ट्रेलियन रेडक्रॉस आपत्ती निवारण आणि पुनर्प्राप्ती निधीकडे दिला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली आग रहिवाशी क्षेत्रात पसरली, ज्याने हजारो कुटुंब बेघर झेले. आगीमुळे सुमारे २३ हजार चौरस मैलांवरील झाडे जळून खाक झाली आहेत. यापूर्वी, टेनिस जगतातील अनेक दिग्गज खेळाडू मददतीसाठी सरसावले होते. सेरेना विल्यम्स, नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नडाल यांसारखे दिग्गज ‘रॅली फॉर रिलीफ’ टेनिस सामन्यात सहभाग घेतला होता. या टेनिस सामन्यात कमावलेली धनराशी पंडितांच्या मदतीसाठी दान करण्यात आली होती. 

Back to top button