पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोहलीने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक 741 धावा केल्या. त्याचा हा फॉर्म टी-20 विश्वचषकात कायम राहिल आणि तो टीम इंडियासाठी भरपूर धावा करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
कोहलीचा हा शेवटचा टी-20 विश्वचषक असू शकतो असे अनेकांनी भाकीत केले आहे. या स्थितीत तो आपल्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. विश्वचषकात कोहलीच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करण्यात त्याचे नाव आघाडीवर आहे. (Virat Kohli Record)
कोहली (1141 धावा) टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने खेळलेल्या सर्व टी-20 विश्वचषकांमध्ये तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. या स्पर्धेत शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. कोहलीने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत 27 सामने खेळले असून त्यातील 25 डावांमध्ये तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही. (Virat Kohli Record)
शून्यावर न बाद होता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 717 धावा आहेत, तर शोएब मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शून्यावर आऊट न होता त्याने 646 धावा केल्या. मार्टिन गुप्टिल (617) चौथ्या, युवराज सिंग (593) पाचव्या, केविन पीटरसन (580) सहाव्या स्थानावर आहेत.
1141 धावा : विराट कोहली
717 धावा : एबी डिव्हिलियर्स
646 धावा : शोएब मलिक
617 धावा : मार्टिन गुप्टिल
593 धावा : युवराज सिंग
580 धावा : केविन पीटरसन
विराट कोहलीला टी-20 विश्वचषक स्पर्धेत 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय करियरमध्ये त्याने आतापर्यंत 522 सामन्यांच्या 580 डावांमध्ये 26733 धावा केल्या आहेत. जर त्याला 27 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण करायला 267 धावांची गरज आहे. जर त्याने हे यश गाठले तर तो अशी कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाज ठरेल. कोहलीच्या आधी हा पराक्रम सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या चौथ्या स्थानावर आहे.