राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अजिंक्य | पुढारी

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अजिंक्य

मिरज : पुढारी वृत्तसेवा

येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विजय मिळविला. 17 वर्षाखाली मुले, मुली व 19 वर्षा खाली मुलांचे महाराष्ट्रातील संघ विजेते झाले. गेल्या तीन दिवसांपासून येथे या मल्लखांब स्पर्धा सुरू आहेत. विजेते आणि उपविजेते पदासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन संघांमध्ये रस्सीखेच सुरू होती.

17 वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्राच्या राजवर्धन पाटील, चेतन मनकारे, सागर चौधरी, अथर्व राजेंद्र यांनी 45.85 गुणांक मिळविला. मध्यप्रदेशच्या कुंदन कचवा, विपुल शर्मा, सोमिल डिसावळ, यश भार्गव यांनी 42.80 गुणांक मिळविले. तमिळनाडूच्या एस. विष्णूप्रिया, मोहनप्रसाद जी, संजयप्रसाद डी, सबरीनाथन आर यांनी 42.65 गुणांक मिळविले. 

17 वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राच्या रूपाली भालेराव, आकांक्षा अभिजित, निर्मल जितेंद्र, विभुती केळस्कर यांनी 24.5 गुणांक मिळवून विजेतपद मिळविले. मध्यप्रदेशच्या जसिका प्रजापती, रिद्धीमा शर्मा, पायल मांडवलिया, दिव्यांशी भाटिया यांनी 22.4 गुणांक मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. तमिळनाडूच्या व्ही. संगीता, एम. सुगण्या, बी. याझीनी, एस. जोथी यांनी 20.6 गुणांक मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. 

19 वर्षा खालील मुले-महाराष्ट्राच्या निहाल विचारे, वैभव गाडवे, अश्विनी धर्मे, प्रथम डांगे यांनी 48.65 गुणांक मिळवून विजेतेपद घेतले. मध्यप्रदेशच्या प्रणव कोरी, इंद्रजित नगर, पंकज गारगम, भुपेंद्र शर्मा यांनी 48.40 गुणांक मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. तमिळनाडूच्या एम. हेमचंद्रण, एम. नवीन कुमार, बी. विष्णू, एस. लोहीत यांनी 45.20 गुणांक मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.

Back to top button