पत्नीला चिअरअप करण्यासाठी मिचेल स्टार्कने सोडला द. आफ्रिकेचा दौरा | पुढारी

पत्नीला चिअरअप करण्यासाठी मिचेल स्टार्कने सोडला द. आफ्रिकेचा दौरा

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांत महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. जागतिक महिला दिनी दोन्ही संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे आणि तो पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. मात्र, सर्वाधिक उत्सुक आहे तो ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्क. त्याची पत्नी अ‍ॅलिसा हिली ही ऑस्ट्रेलिया संघातून खेळत असून, तिला चिअरअप करण्यासाठी स्टार्कने राष्ट्रीय संघासोबतचा दौरा अर्ध्यावर सोडला आणि थेट मेलबर्नसाठी रवाना झाला.

पत्नीला वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना पाहण्यासाठी स्टार्कने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ आफ्रिका दौर्‍यावर आहे आणि वन-डे मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी होणार आहे;  पण आता स्टार्क त्यात खेळणार नाही. ‘पत्नीला वर्ल्डकप फायनल खेळताना पाहण्याची संधी ही आयुष्यात एकदाच मिळणार आहे आणि त्यामुळे अ‍ॅलिसाला चिअर करण्यासाठी स्टार्कने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button