कोरोना :.. जेव्हा जुवेंटस स्टारला श्वासही घेता येत नाही  | पुढारी

कोरोना :.. जेव्हा जुवेंटस स्टारला श्वासही घेता येत नाही 

ब्येऊनोस अॅरिस : पुढारी ऑनलाईन 

जुवेंटस फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू पावलो डयबाला याने आपल्याला कोरोना झाल्यानंतर आपली काय हालत झाली होती हे सांगितले. त्यांना आपल्याबरोबर जुवेंटसच्या अजून दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. डॅनियल रुगानी आमि ब्लैस मटैदी यांच्यातही कोरोनाची लक्षण अढळून आल्याचे सांगितले. 26 वर्षीय डयबालाने आता आपल्याला बरे वाटत असल्याचे सांगितले. 

पावलो डयबालाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘दोन दिवसांपूर्वी मी खूप अस्वस्थ होतो, मला पाच मिनिटेही हालचाल केली तरी श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. पण, आता मी चालत – फिरत आहे आणि ट्रेनिंग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्नही करत आहे.’ 

तो पुढे म्हणाला ‘मला माझे शरीर जड झाल्यासारखे वाटत होते, श्वास घेण्यात त्रास होत असल्याने मला काही करता येत नव्हते, माझे स्नायू दुखत होते. आता मी ठीक आहे आणि माझी होणारी पत्नीही कोरोनाच्या प्रादुर्भावातून सावरत आहे.’

डयबालाने यंदाच्या हंगामात 13 गोल मारल्या आहेत, त्याने जुवेंटसकडून हंगामातील शेवटचा गोल इंटर मिलान विरुद्ध मारला होता. त्यानंतर इटलीतील सर्व सामने निलंबित करण्यात आले. या गोलबद्दल डयबाला म्हणतो, ‘इंटर मिलान विरुद्ध मारलेला गोल ही सर्वोच्च भावना होती, रॅमसीने जबरदस्त पास दिला पण, हा गोल बघायला प्रेक्षक नव्हते त्याचे वाईट वाटते.’

Back to top button