पहिल्या विजयासाठी सनरायजर्स-केकेआर उत्सुक | पुढारी | पुढारी

पहिल्या विजयासाठी सनरायजर्स-केकेआर उत्सुक | पुढारी

अबुधाबी : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पराभूत झालेले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांत शनिवारी लढत होत असून, पहिला विजय मिळवण्यास दोन्ही संघ उत्सुक असतील. कोलकाता संघाने मुंबईकडून तर हैदराबाद संघाने बेंगलोरकडून पराभव पत्करावा लागला आहे. 

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या रणनीतीवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे त्याला आता आपल्या स्वत:च्या कामगिरीबरोबरच नेतृत्वगुणांतही सुधारणा करावी लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या सत्राच्या तुलनेत अनेक बदल करीत बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरला. मात्र, त्याची सामन्यातील रणनीती पाहून तसे वाटत नव्हते. मुंबईविरुद्धचा सामना 49 धावांनी गमाविल्यानंतर आंद्रे रसेल याच्या फलंदाजी क्रमवारीबाबत प्रशचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. गेल्या सत्रात 510 धावा करणारा हा फलंदाज मैदानात उतरला तेव्हा संघाच्या अडचणीत आणखीन भर पडली होती.

सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिल्या सामन्यात चमक दाखवता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर मधल्या फळीतील फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. शेवटच्या पाच षटकांत संघाला विजयासाठी 43 धावांची गरज होती; पण त्यांना 32 धावांच करता आल्या. दुखापतीमुळे मिचेल मार्शला स्पर्धेबाहेर पडावे लागले. वॉर्नरचा प्रयत्न या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा असणार आहे. 

संघ यातून निवडणार :

 सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशीद खान, मिचेल मार्श, अभिषेक शर्मा, बावनका संदीप, संजय यादव, फॅबियन अ‍ॅलन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, बसिल थम्पी.

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), इयान मॉर्गन, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक, टॉम बेंटोन.

 

Back to top button