विराटनं सूर्यकुमारला केलं स्लेजिंग; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

विराटनं सूर्यकुमारला केलं स्लेजिंग; व्हिडिओ व्हायरल

दुबई : पुढारी ऑनलाईन

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आबुधाभीमध्ये रंगलेल्या ४८ व्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला ५ विकेटने पराभूत केले. यावेळी मैदानात काहीसा विचित्र प्रकार घडला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कालच्या सामन्यात हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली सूर्यकुमार यादवकडे पाहत स्लेजिंग करत असल्याचे पाहायला मिळाले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून विराटवर जोरदार टीका होत आहे. 

नेमक काय घडलं?

सूर्यकुमार यादवने ४३ व्या चेंडूवर ७९ धावांची नाबाद खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला. जेव्हा सूर्यकुमार ४० व्या चेंडूवर खेळत होता त्यावेळी विराट कोहली चेंडू हातात घेऊन थेट सूर्यकुमारजवळ जाऊन त्याच्याकडे रागाने पाहू लागला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट काय बोलला काही समजले नाही.  पण सूर्यकुमारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो क्रिजवर खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झाला. 

मैदानातील विराटचे हे कृत्यू चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही. नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी या सामन्यात कोहलीने आमच्या मनातील त्याच्याविषयीची आदर गमावला आहे, असेदेखील म्हटले आहे. 

Back to top button