महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघांची घोषणा | पुढारी

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघांची घोषणा

मुंबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर सुपरनोव्हाज आणि स्मृती मानधना ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. दीप्ती शर्माकडे व्हेलोसिटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाची कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना विश्रांती दिली गेली आहे.

अखिल भारतीय महिला निवड समितीने या 3 संघांसाठी खेळाडूंची निवड केली. प्रत्येक संघासाठी 16 खेळाडू निवडण्यात आले आहेत. आयपीएल 2022 च्या शेवटच्या टप्प्यात महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन केले जाणार आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील यंदाच्या हंगामाचे आयोजन 23 ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे केले जाईल. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स आमने-सामने येतील.

किरण नवगिरेची कमाल

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूरच्या किरण नवगिरे या आणखी एका मराठी कन्येने महिलांच्या टी-20 चॅलेंजर्स स्पर्धेतून खेळण्याचा बहुमान पटकावलाय. वास्तविक ती आहे अ‍ॅथलिट. तथापि, पुण्याच्या आझम क्रिकेट अकादमीत तिने क्रिकेटचे धडे गिरवले अन् आता ती थेट पोहोचलीय महिलांच्या आयपीएलमध्ये! आरती केदारप्रमाणेच किरणनेही आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय.

स्पर्धेचे वेळापत्रक

महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील 3 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. 24 मे रोजी सुपरनोव्हाज आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. तिसरा सामना 26 मे रोजी व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

महिला टी-20 चॅलेंज 2022 साठी संघ

सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन मल्लिका, शर्मीन अख्खा, शर्मीन अख्तर, एस. बी. पोखरकर.

व्हेलोसिटी : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शेफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चांटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्त बहादुरी, यस्तिका प्रणवी चंद्रा.

Back to top button