LSG vs RCB : बंगळूरचे लखनौसमोर 182 धावांचे आव्हान | पुढारी

LSG vs RCB : बंगळूरचे लखनौसमोर 182 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूर रॉयल चॅलेंजर्सने लखनौसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीचा संघ २० षटकात ६ बाद १८१ धावा करू शकला. लखनौकडून होल्डर आणि दुष्मंता चमीराने 2-2 फलंदाजांना बाद केले.

शाहबाज धावबाद झाला

बंगळुरूने त्यांची पाचवी विकेट गमावली आहे. चांगल्या भागीदारीनंतर शाहबाज अहमद धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहबाजने बाद होण्यापूर्वी 22 चेंडूत 26 धावा केल्या.

डु प्लेसिस-शहबाज यांची अर्धशतकी भागीदारी

फाफ डु प्लेसिस आणि शाहबाज अहमद यांनी मिळून शानदार अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी केली.

डु प्लेसिसचे अर्धशतक

बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. डू प्लेसिसने 40 चेंडूत 24 वे आयपीएल अर्धशतक झळकावले.

पहिल्या पॉवरप्लेचे नाव लखनऊ

लखनौच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बॅकफूटवर पाठवले. लखनौने पहिल्या सहा षटकांत म्हणजे पहिल्या पॉवरप्लेमध्ये बेंगळुरूच्या तीन विकेट्स घेत 47 धावा दिल्या.

क्रुणालने मॅक्सवेलला बाद केले

कृणाल पांड्याने बंगळुरूला मोठा धक्का दिला आहे. पंड्याने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फटकेबाजी करत असलेल्या मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप खेळला आणि शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या जेसन होल्डरने त्याच्या डावीकडे झेपावत सुरेख झेल घेतला. मॅक्सवेलने 11 चेंडूत 23 धावा केल्या.

मॅक्सवेलकडून चमीराची धुलाई

पहिल्या षटकात दोन विकेट घेणाऱ्या दुष्मंता चमीरासाठी दुसरे षटक महागडे ठरले. या षटकात मॅक्सवेलने लागोपाठ दोन चौकार आणि एक षटकार ठोकत एकूण 19 धावा वसूल केल्या.

बंगळूरला दोन झटके…

दुष्मंता चमीराने पहिल्याच षटकातच बंगळुरूला दोन मोठे धक्के दिले. त्याने चौथ्या चेंडूवर अनुज रावतला केएल राहुलकरवी झेलबाद केले. यानंतर विराट कोहली पुढच्या चेंडूवर खाते न उघडता हुड्डाकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

दोन्ही संघांनी आजच्या सामन्यासाठी कोणतेही बदल केले नाहीत आणि त्यांच्या आधीच्या संघासह ते मैदानात उतरले आहेत. एलएसजी आणि आरसीबी पाचवा विजय मिळवण्याच्या तयारीत असून दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आहेत. एकीकडे नव्या दमाचा लखनौचा संघ आहे, ज्याने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या बाजूला IPL ची सर्वाधिक चर्चित RCB चा संघ आहे, ज्यांनी 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे.

RCB चा संघ

फाफ डू प्लेसिस (कर्नधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज

LSG चा संघ

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई

Back to top button