सोनीपतमध्‍ये रबर कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी | पुढारी

सोनीपतमध्‍ये रबर कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील राय औद्योगिक वसाहतीमध्‍ये आज (दि.२८ मे) रबर कारखान्याला  भीषण आग लागली. कारखान्‍यातील सिलिंडरचा स्फोटही झाला. या दुर्घटनेत २० हून अधिक कामगार जखमी झाल्‍याचे वृत्त आहे.

हा कारखाना रबर बेल्‍ट निर्मितीचा होता. अर्धा डझनहून अधिक कामगार अडकले होते. सोनीपत अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला.

कारखान्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्‍यात रबर निर्मितीेचे साहित्‍य असल्याने आगीने काही क्षणात कारखान्‍यातला आपल्‍या कवेत घेतले. १६ कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

Back to top button