SRH vs RR : राजस्थानचा हैदराबादवर 61 धावांनी विजय | पुढारी

SRH vs RR : राजस्थानचा हैदराबादवर 61 धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 210 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने आपल्या 100 व्या सामन्यात राजस्थानसाठी खास खेळी खेळली. तो 27 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 41 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 13 चेंडूत 32 धावा केल्या.

प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 149 धावा करू शकला. हैदराबादकडून एडन मार्करामने सर्वाधिक धावा केल्या. तो 41 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावांची खेळी केली.

राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 6 गडी गमावून 210 धावा केल्या. राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने आपल्या 100 व्या सामन्यात 27 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी केली. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे 16 वे अर्धशतक होते. सॅमसनने आपल्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकार मारले.

राजस्थान संघ नशीबवान ठरला. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने बटलरला पूरनकडे झेलबाद केले, पण चेंडू नो बॉल ठरला आणि बटलरला जीवदान मिळाले. यानंतर बटलरने यशस्वी जैस्वालच्या साथीने ५८ धावांची सलामी दिली.

संजू सॅमसन बाद

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची झंझावाती खेळी संपुष्टात आली. भुवनेश्वर कुमारने त्याला 17व्या षटकात अब्दुल समदकरवी झेलबाद केले. राजस्थानसाठी सॅमसनचा हा 100 वा सामना होता. हा सामना खास बनवत त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. सॅमसनने आपल्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकार मारले.

Image

उमरान मलिकने बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

राजस्थान रॉयल्सला नवव्या षटकात दुसरा धक्का बसला. उमरान मलिकने जोस बटलरचा बदला घेतला. राजस्थानच्या डावाच्या चौथ्या षटकात उमरानच्या चेंडूवर बटलरने 20 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर उमरानने नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बटलरला यष्टिरक्षक निकोलस पूरनकडे झेलबाद केले. बटलर 28 चेंडूत 35 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

राजस्थानला पहिला धक्का

राजस्थान संघाला पहिला धक्का सातव्या षटकात ५८ धावांवर बसला. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या रोमारियो शेफर्डने यशस्वी जैस्वालला मार्करामकरवी झेलबाद केले. यशस्वीला 16 चेंडूत 20 धावा करता आल्या. त्यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तत्पूर्वी, यशस्वी आणि बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये पहिल्या सहा षटकांत ५८ धावा जोडल्या. सात षटकांनंतर राजस्थानने एका विकेटच्या मोबदल्यात 60 धावा केल्या.

उमरानच्या षटकात २१ धावा

चौथ्या षटकात तुफानी गोलंदाज उमरान मलिक गोलंदाजी करायला आला. या षटकात उमरानने 150 च्या वेगाने चेंडू टाकला. या षटकात ओव्हरचा तिसरा चेंडू उमरानने 150 किमी प्रतितास वेगाने टाकला. त्याचवेळी चौथा चेंडू ताशी 148 किमी आणि पाचवा चेंडू 146 किमी प्रतितास वेगाने फेकला गेला. पण बटलर-जैस्वाल जोडीने २१ धावा कुटल्या.

बटलरला जीवदान

राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. त्याचवेळी हैदराबादने भुवनेश्वर कुमारकडे चेंडू सोपवला. पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. भुवनेश्वरच्या पाचव्या चेंडूवर जोस बटलर झेलबाद झाला. यानंतर बटलरने डग आऊटच्या दिशेने वाटचाल सुरू केली, पण पंचांनी त्याला रोखले. भुवनेश्वरने ओव्हरस्टेप केल्यामुळे तिसऱ्या पंचांनी चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला आणि बटलरला जीवदान मिळाले. बटलर तेव्हा शून्यावर फलंदाजी करत होता.

Image

सॅमसन राजस्थानसाठी 100 वा सामना

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून 100 वा सामना खेळत आहे. या संघासाठी तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. या सामन्यापूर्वी सॅमसनने आयपीएलमध्ये 121 सामने खेळले आहेत. त्याच्या 117 डावांमध्ये त्याने 29.22 च्या सरासरीने 3068 धावा केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स संघ :

यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नाथन कूल्टर-नाइल, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा

Image

सनरायझर्स हैदराबाद संघ :

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), एडेन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंगटन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

Image

 

Back to top button