वडिलांनी मला का समजून घेतले नाही?  | पुढारी

वडिलांनी मला का समजून घेतले नाही? 

पणजी; तेजश्री कुंभार : मी सध्या बी.एडचे शिक्षण घेत आहे. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविला असून कला शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. माझे वडील माझ्या लैंगिकतेच्या विरोधात आहेत. ऐन टाळेबंदीच्या काळात त्यांनी मला घराबाहेर हाकलले. खायला अन्न नाही झोपायला छत नाही. माझे कर्तृत्व आणि त्यांच्या प्रेमापेक्षा माझी लैंगिकता इतकी मोठी आहे का? तृतीपंथीय असणाऱ्या संगीताची ही सत्य कथा आहे.

कोरोनाच्या कालावधीत गोव्यातील अर्ज संस्थेने गोवा, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई येथील तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर झालेला महामारीचा परिणाम’ विषयावर सर्व्हे केला आहे. सर्व्हेमध्ये १३९ देहविक्री करणाऱ्या महिला तसेच ७३ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. समभावना संस्था आणि माझ्या प्रियकराने मला साथ दिली नसती तर कदाचित आज मी जिवंत नसते, असे संगीता सांगते. तिच्यासारखी वेदना सहन केलेले हृदय पिळवटून टाकणारे अनुभवकथन या सर्व्हेमध्ये आहे.

महामारीच्या या कठीण कालावधीत घरच्यांना आमची आठवण येईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे या कालावधीत मनावर असणारी नाकारात्मकतेची भावना अधिक ठळक झाली. इस्पितळात गेल्यानंतर मला महिलांच्या यादीत उभे राहायचे होते, मात्र जबरदस्तीने पुरुषांच्या रांगेत उभे केले गेले. या यातना सहन कराव्या लागल्या.

– कमर्शियल सेक्स साईट बंद असल्याने ९० दिवस एकही ग्राहक नव्हता.

– ५० किंवा ५०० कितीही पैसे मिळाले तरी हा पैसा जेवणासाठी संपायचा.

– वीजबिल न भरल्याने कित्येक महिने अंधारात राहावे लागले.

– ओळखपत्रे नसल्याने इस्पितळात गेल्यावर त्रास झाला.

-विषाणू चालला असता पण टाळेबंदी जीवावर उठली.

– ज्यांच्यावर प्रेम होते त्यांनी हात अर्ध्यातच सोडून स्वतःच्या कुटूंबाला जवळ केले.

– पोटाची खळगी भरण्यासाठी मुस्लिम धर्मीय लहानांनी रोजा धरला.

– सॅनिटरी पॅडस आणि स्वछ्तेबाबतच्या वस्तू पोहचल्या नाहीत

… आणि मगच मुलाला इस्पितळात घेतले.


देहविक्री करणाऱ्या महिलेचा मुलगा खूप आजारी होता. पैसे नसल्याने तिने त्याला सरकारी इस्पितळात नेले. मात्र हातात कागदपत्रे नसल्याने त्याला भेटी करून घेण्यास मनाई केली. याउलट तिच्याकडे पैसे मागितले. त्या महिलेने गयावया करीत हंबरडा फोडला तरी तिचे कोणीही ऐकून घेतले नाही. शेवटी तेथीलच एका परिचारिकेने त्या मुलाचे पैसे भरले.

या कालावधीत आम्ही आमच्या परीने गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील महिलांना आणि तृतीयपंथीयांना मदत केली आहे. त्यांना आम्ही धनधान्य पुरविले आहेच, पण त्यासोबत ‘विश’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून महिला दुपट्टा, ओढणी, मास्क आणि वेगवेगळ्या वस्तू तयार करीत आहेत. आम्ही त्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी झटत असतो.


अरुण पांडे, संस्थापक, अर्ज

वाचा : काँग्रेसमध्ये आजपासून प्रदेशाध्यक्षासाठी खल

वाचा : सरकारने दाखवले नोकर्‍यांचे गाजर

Back to top button