'बसमधून १० मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी; विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही' | पुढारी

'बसमधून १० मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी; विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही'

पुणे; पुढारी ऑनलाईन : आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. पवार म्हणाले की,” अनेक जणांची यंदा पायी वारीसाठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.”

अधिक वाचा : आधारकार्डला मोबाईल नंबर कसा अपडेट कराल? कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही!

दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बसने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल.  महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. रथोत्सव सध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले. यंदा पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बसनेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १० महत्वाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : अजित पवारांनी बांधकाम दर्जा पाहून पोलीस आयुक्त आणि ठेकेदाराचा जागेवरच घेतला ‘क्लास’!

आषाढी एकादशी २० जुलै रोजी आहे. १ जुलै रोजी संत तुकाराम तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू व आळंदीतून प्रस्थान होईल. यंदा १० पालख्यांना २० बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्थान वारीत ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीत ४० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

Back to top button