krutika tulaskar : नवी ‘शेवंता’ कृतिका तुळसकर आहे तरी कोण?

कृतिका तुळसकर साकारणर शेवंताची भूमिका
कृतिका तुळसकर साकारणर शेवंताची भूमिका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील शेवंत म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिने मालिका सोडलीय. तिने मालिका सोडल्यानंतर मात्र फॅन्सची निराशा झालीय. त्यामुळे काही चाहत्यांकडून आता आम्ही मालिका पाहणं बंद करू, अशाही प्रतिक्रिया आल्या. यादरम्यान, नव्या शेवंताची चर्चा संगळीकडे रंगलीय. ही नवी शेवंता आहे तरी कोण? असा प्रश्न पडला असताना एका नव्या कलाकाराचे नाव पुढे आले. ते म्हणजे कृतिका तुळसकर. (krutika tulaskar) ती अपुर्वा नेमळेकरच्या जागी भूमिका करेल. नवी शेवंता कृतिका तुळसकर ही हॉट तर आहेच. पण, तिची भूमिका प्रेक्षकांना कितपत आवडेल, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. (krutika tulaskar)

'रात्रीस खेळ चाले ३' ही मालिका लोकप्रिय ठरलीय. अण्णा नाईक-शेवंता या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तर नाईकांचा वाडाही या मालिकेतील महत्त्वाचा भाग ठरलाय.

अपुर्वाप्रमाणेच कृतिकाही आता तशाचं अदा, अभिनय करेल का, त्या प्रेक्षकांना कितपत भावतील, नव्या शेवंताला आता आणखी कुठल्या नव्या कथांना सामोरं जावं लागणार, या सर्व गोष्टी आगामी काळचं ठरवेल.

कोण आहे कृतिका?

रात्रीस खेळ चाले मालिकेत कृतिका हा नवा चेहरा पाहायला मिळेल. शेवंताची भूमिका ती साकारणार आहे. कृतिका एक थिएटर आर्टिस्ट आहे. गेली १८ वर्षे ती या माध्यमात आहे. तिने अनेत नाटके आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती एक उत्तम नृत्यांगना आहे. कथ्थक विशारद आहे.

खरंतरं ती एक प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट आहे. पण, अभिनयाची आवड असल्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली.

शेवंताच्या भूमिकेविषयी ती सांगते- शेवंता साकारणे एक आव्हान आहे. तिच्या अभिनय क्षेत्रामधील हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंटआहे.
शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आलीय. पण, ही भूमिका हुबेहुब साकारणं मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना माझं काम आवडेल. ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news