Anil Kapoor : अनिल कपूरवर जर्मनीत उपचार, व्हिडिओ केला शेअर | पुढारी

Anil Kapoor : अनिल कपूरवर जर्मनीत उपचार, व्हिडिओ केला शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) याने नुकताच सोशल मीडियावर जर्मनी वरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओ सोबत त्याने असे काही लिहिले आहे की ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना काळजी वाटू लागलीय. या व्हिडिओत अनिल कपूर जर्मनीत रस्त्यावरून चालत जाताना दिसतोय. यावेळी बर्फ पडत आहे. उपचाराचा शेवटचा दिवस असून आपण डॉक्टरना भेटण्यासाठी जात असल्याचे त्यानं नमूद केलंय.

”बर्फ पडत असताना चालत जातोय. जर्मनीमध्ये शेवटचा दिवस! डॉ. मूलर यांना माझ्यावरील उपचाराच्या शेवटच्या दिवशी भेटण्यासाठी जातोय! A perfect walk in the snow!Last day in Germany! On my way to see Dr Muller for my last day of treatment! So thankful to him for his magic magical touch!” असे अनिलनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

अनिल कपूरच्या (Anil Kapoor) पोस्टवर चाहत्यांनी, ‘नेमकं काय झालंय तुम्हाला, सगळं ठीक तर आहे ना’ अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी वाटत असल्याचं म्हटलंय. अनिल कपूर ‘एव्हरग्रीन’ अभिनेते म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी ते ‘मलंग’ आणि ‘एके वर्सेज एके’ चित्रपटात दिसले होते. लवकरच ते ‘जुग जुग जीयो’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे.

हे ही वाचा :

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

Back to top button