बप्पी लाहिरी : ढिगभर सोनं घालण्यामागं 'हे' आहे खास कारण - पुढारी

बप्पी लाहिरी : ढिगभर सोनं घालण्यामागं 'हे' आहे खास कारण

पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमध्ये कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, असे काही कलाकार आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. यापैकी एक आहेत-बप्पी लाहिरी. बप्पी यांनी बॉलिवूडमध्ये दीर्घ प्रवास केला. सुरूवातीला त्यांचे संगीत नाकारले गेले. परंतु, पुढे-पुढे त्यांची गाणी ऐकली जाऊ लागली. तर काही गाण्यांनी धूमाकू‍ळ घातला. बप्पी लाहिरी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात-एक म्हणजे युनिक म्युझिक आणि दुसरे गोल्ड. बप्पी दा बॉलिवूडचे गोल्डन किंग म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस. अखेर ते इतकं सोनं का घालतात? आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

 

बप्पी लाहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर, १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षी बप्पी दा बॉलिवूडमध्ये गाण्यांना संगीत देऊ लागले होते. त्यांनी १९७३ मध्ये चित्रपट नन्हा शिकारीमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. बप्पी यांना पहिल्यांदा ओळख मिळाली १९७६ मध्ये आलेला विशाल आनंद यांचा चित्रपट ‘चलते-चलते’मधून. बॉक्स ऑफिस या चित्रपटाची खास जादू चालली नाही, परंतु, गाणी सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली.

या गाण्यांनी घातला धुमाकूळ

१९८२ मध्ये आलेला चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट ‘डिस्को डान्सर’मुळे बप्पी यांचे करिअर बहरले. या चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. ‘नमक हलाल, शराबी, हिम्मतवाला, साहेब, गुरू, घायल आणि रंगबाज’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले.

२००० नंतरदेखील चित्रपटांमध्ये ते सक्रिय आहेत. ‘टॅक्सी नंबर 9211,’ ‘द डर्टी पिक्चर,’ ‘हिम्मतवाला,’ ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं.

इतके सोने का घालतात बप्पी?

एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले होते की, ते इतके सोने का घालतात? यावर बप्पी म्हणाले-हॉलिवूडमध्ये एलविस प्रेस्ली सोन्याची चेन गालत होते. मला एलविस खूप आवडायचा. मी नेहमी हा विचार करायचो की, जर मी जीवनात खूप यशस्वी झालो तर मी माझी एक वेगळी ओळख निर्माण करेन. परमेश्वराची कृपा आहे की, मी इतकं सोनं घालू शकलो. सोने माझ्यासाठी लकी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बप्पी यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षा अधिक सोने आहे. बप्पी यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ही गोष्ट मेंशन करण्यात आली आहे की,  त्यांच्याकडे एकूण ७५४ ग्रॅम सोने आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम सोने आहे.

केवळ सोनेच नाही तर बप्पी यांच्याकडे चांदीदेखील आहे. बप्पी दा यांच्याकडे ४.६२ किलो चांदी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ८.९ किलो ग्रॅम चांदी आहे.

बप्पी यांनी लॉकेट घालणे आवडते. त्यांच्याकडे गणेश यांची प्रतिमा असलेले  एक लॉकेट आहे. हे लॉकेट ते नेहमी घालतात. तसेच ते काही आकर्षक चेन आणि ब्रेस्लेट घालतात.

हेदेखील वाचा-

Back to top button