

पुढारी ऑनलाईन डेस्क
टीव्ही इंडस्ट्रीनंतर बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या लग्नावरून चर्चेत आहे. मौनी दुबई बेस्ड बिझनेसमॅन सूरज नंबियारला डेट करत आहे. दोघे खूप दिवसांपासून दुबईमध्ये आहेत. आता ती सूरजसोबत २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगलीय. (Mouni Roy)
तिने सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केले आहेत. ती आपल्या बेडरूममध्ये मस्ती करताना दिसतेय.
तिने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बाथरोबमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहून अंदाज लावू शकतो की, मौनी मस्तीच्या मूडमध्ये आहे.
फोटोमध्ये मौनी बाथरोब घालून आपल्या बेडवर दिसतेय. कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसतेय. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सचं मन तिने जिंकलंय.
याशिवाय मौनीने कॉफीचा फोटोदेखील शेअर केलाय. यासोबत तिने रायटर ऑस्कर वाईल्डच्या काही ओळी शेअर केल्या आहेत.
या फोटोंसोबत तिने कॅप्शन लिहिलीय, 'वेक अप मेकअप वर्क चिल.'मौनी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय. युजर्स तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सने या फोटोंवर हार्ट इमोजी शेअर केलीय.
मौनीने आपल्या करिअरची सुरुवात 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती. यानंतर तिने 'कस्तूरी', 'देवों के देव महादेव', 'नागिन', 'नागिन 2', 'टशन-ए-इश्क', 'जूनून', 'ऐसी नफरत तो कैसा इश्क', 'कृष्णा चली लंदन', 'झलक दिखला जा 9', 'एक था राजा एक थी रानी' यासारख्या मालिकांमध्ये काम केले. तिला खरी ओळख मिळाली ती 'नागिन' या मालिकेतून.
छोट्या पडद्य़ावरून तिने मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली. अभिनेता अक्षय कुमार सोबत गोल्ड या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.