Kanpur Test : 'डेंजर एरिया'वरून अश्विन आणि पंचांमध्ये जोरदार वाद | पुढारी

Kanpur Test : 'डेंजर एरिया'वरून अश्विन आणि पंचांमध्ये जोरदार वाद

कानपूर : पुढारी ऑनलाईन : Kanpur Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर गरमागरम वातावरण होते. टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत असताना पंचांनी त्याच्या फॉलो थ्रूवर आक्षेप घेतला. यादरम्यान अश्विन आणि पंच नितीन मेनन यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा प्रकार पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेला हस्तक्षेप करावा लागला.

आज,सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडियाची गोलंदाजी सुरू आहे. उपहारापर्यंतचा खेळ संपलेला असून पाहुण्या न्यूझीलंडची धावसंख्या २ गडी गमावून १९७ आशी आहे. दरम्यान, आज आज सकाळी न्यूझीलंडने कालच्या १२९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांना पहिला झटका रविचंद्रन अश्विनने दिला. त्याने विक यंगला (८९) माघारी धाडले. यावेळी पाहुण्या संघाची धावसंख्या १५१ होती. त्यानंतर अश्विन पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सरसावला. पण मैदानी पंच नितीन मेनन यांनी रविचंद्रन अश्विनला मधेच अडवले.

Kanpur Test : 'डेंजर एरिया'वरून अश्विन आणि पंचांमध्ये जोरदार वाद
Kanpur Test : ‘डेंजर एरिया’वरून अश्विन आणि पंचांमध्ये जोरदार वाद

असे झाले की, रविचंद्रन अश्विन राउंड द विकेट बॉलिंग करत होता, पण बॉल फेकल्यानंतर तो मागे फिरून ओव्हर द विकेटवर पोहोचत होता. यादरम्यान, तो खेळपट्टीचे धोक्याचे क्षेत्र ओलांडत होता आणि नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाचा मार्गही अडवत होता. पंचानी ही बाब अश्विनच्या निर्शनास आणून दिली. पण अश्विन भडकला आणि पंचांशी वाद घालू लागला. मी कोणताही नियम मोडत नसल्याचे त्याने पंचांना सांगितले. हा गोंधळ इतका टोकाला पोहोचला की कर्णधार रहाणे आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या वादात उडी घ्यावी लागली. रहाणे मैदानी पंचांजवळ तर द्रविड सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्याकडे गेले. हा प्रकार ७७व्या षटकादरम्यान घडला.

Back to top button