met gala २०२१ नंतर रणवीरची जोरदार चर्चा,अतरंगी फॅशन आणि बरंच काही…

met gala २०२१ नंतर रणवीरची जोरदार चर्चा,अतरंगी फॅशन आणि बरंच काही…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नेहमीप्रमाणे यावेळी न्यूयॉर्कमध्ये मेट गाला २०२१ ( met gala २०२१ ) ने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हॉलिवूड स्टार्संनी वेगवेगळी अतरंगी फॅशन साकारत ( met gala २०२१ ) मध्ये हजेरी लावली. याच दरम्यान हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन हिच्या लूकने सर्वांनाच चकित केले. परंतु, खास करून अभिनेता रणवीर सिंहच्या अतरंगी फॅशन ची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली.

यावर्षी न्यूयॉर्कमध्ये मेट गालाचे आयोजन करण्यात आले होतं. या सोहळ्यात बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्संनी अतरंगी फॅशनची झलक दाखवली. यात काही कलाकारांनी आपल्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचं मन जिंकलं तर काहींनी सर्वांना आपल्या फॅशनने आश्चर्यचा धक्का दिला. याच दरम्यान हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन हिच्या फॅशनची जोरदार चर्चा झाली.

मेट गाला२०२१ च्या इव्हेंटमध्ये किम कर्दाशियनने स्वतःला संपूर्ण एका काळया रंगाच्या ड्रेसमध्ये गुंडालेले होते. यातील विशेष म्हणजे, किमने आपला चेहरासुद्धा काळया रंगाच्या कपड्यात झाकलेला होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही युजर्सनी तिच्‍या फॅशनला लाईक केले तर काहींनी ट्रोल केले.

यानंतर नुकतेच किमच्या लुकवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने हटके प्रतिक्रिया देत 'हे काय चाललंय' असा प्रश्न उपस्थित केला आहे. याच दरम्यानच्या एका मीम्समध्ये एका बाजूला किम आणि दुसऱ्या बाजूला एक मिस्ट्रीमॅन दिसत होता.

मिस्ट्रीमॅन पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्यांत असल्याने तो किमचा पती वेस्ट कान्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे. परंतु, सुत्राच्या माहितीनुसार, किमच्या पतीने मेट गाला २०२१मध्ये हजेरी लावली नव्हती.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहदेखील अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतो. त्यामुळे रणवीर सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे.

किमच्या अंतरगी फॅशननंतर सध्या रणवीर सिंहच्या फॅशनकडे चाहते वळले आहेत. याच दरम्यान अनेक युजर्संनी त्याच्यावर कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्संने 'बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड रणवीरला फॅशनच्या बाबतीत कोणी नाही मागे टाकू शकत. त्याच्यासमोर अनेक स्टार्स फिके पडतात' असे म्हटले आहेत.

यानंतर रणवीरच्या जुन्या फोटोंवरून मोठ्या प्रमाणात मजेशीर मीम्स बनवण्यात येत आहेत.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे मेट गाला संभारंभ रद्द करण्यात आला होता. यावर्षी पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये मेट गालाचे आयोजन करण्यात आले.

यात किम कार्दाशियनसोबत जेनिफर लोपेझ, मेगन फॉक्स, रिहाना, बेन अफ्लेक, किम कार्दाशियन, एमिली ब्लंट, डॅन लेव्ही, टिमोथी शालेमसह इतर मोठ्या सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या दरम्यान अनेक कलाकारांच्या फॅशनची देखील जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली.

हेही वाचलंत का? 

\

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news