

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने माय- लेकींंचा दुर्दैवी अंत (मृत्यू) झाल्याची घटना बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडली. सुदैवाने एक मुलगी या घटनेतून बचावली.
अश्विनी सुरेश लावंड (वय ४०) व समृध्दी सुरेश लावंड (वय १५) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
स्थानिकानी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अश्विनी या आपल्या दोन मुलींसह बक-या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी तहान लागल्याने शेततळ्यातून प्लास्टिक बाटलीने पाणी काढताना समृध्दी ही पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या अश्विनी यानी पाण्यात उतरत तिला काढण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान दुसरी मुलगी श्रावणीही तिच्या मदतीला आली. तिघीही पाण्यात पडल्या. यानंतर श्रावणी ही शेततळ्यातील प्लास्टिक कागदाला धरुन कशीबशी बाहेर आली. तिने आरडाओरडा केल्यावर स्थानिक नागरिक जमा झाले.
स्थानिक नागरिकांनी अश्विनी व समृध्दी याना पाण्याबाहेर काढले. परंतु, तोपर्यत या दोघी माय- लेकींंचा दुर्दैवी अंत (मृत्यू) झाला होता. यानंतर या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : तळिये गावचा विध्वंस मांडला देखाव्यातून