Kiara Advani : कियाराचे हॉट क्रिम ड्रेसवर मोकळे केस पाहून चाहते पागल ❤❤️

kaiara advani
kaiara advani

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता वरुण धवनचा 'जुगजुग जिओ' हा चित्रपट बॉलिवूडमध्ये चर्चेत होता. (Kiara Advani) या शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. जुग्जुग जिओ पाहिल्यानंतर अनेकजण त्याचे कौतुक करताना थकत नाहीत, तर अनेकांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. या चित्रपटात कियारा अडवाणी, वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. दरम्यान, कियाराचे खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (Kiara Advani)

कियारा
कियारा

कियाराने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने बॉडीकॉन क्रीम कलर हॉट ड्रेस घातलेला दिसतो. न्यूड मेकअप आणि ओपन हेअरमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसतेय. तिच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, जुगजुग या चित्रपटाचे कलेक्शन पाहुया.

कियारा
कियारा

ओपनिंग डे कलेक्शन कसे होते?

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण ओपनिंग डे कलेक्शनने सगळ्यांच्याच आशा धुळीस मिळवल्या आहेत. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, जुगजुग जिओने पहिल्या दिवशी १० कोटींची कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ९.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे.

कियारा
कियारा

चित्रपटाला मिळालेल्या रिव्ह्यूनुसार, वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई खूपच कमी आहे. तरीही वीकेंडला चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. दुसरीकडे, करण जोहरच्या चित्रपटाची तुलना कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २ सोबत केली. तर व्यवसायाच्या बाबतीत जुगजुग जिओ भूलभुलैया-२ च्या मागे आहे, कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४.११ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

कियारा
कियारा

कथा काय आहे?

जुग्जुग जिओ हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कुकू (वरुण धवन) आणि नैना (कियारा अडवाणी) यांच्याभोवती फिरते. शाळेच्या वेळेपासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नही होते, पण लग्नानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही वेगळे होण्याचा विचार करतात. कुकू हा एकटाच त्याच्या वैवाहिक जीवनामुळे त्रस्त नाही तर त्याचे वडील भीम (अनिल कपूर) देखील घटस्फोट घेण्याच्या विचारात आहेत. पटियालाच्या या कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्यांच्या नात्यामुळे त्रस्त आहे. आता चित्रपटाच्या शेवटी कोणाचं लग्न टिकतं आणि कोणाचा घटस्फोट होतो. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल.

कियारा
कियारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news