swara bhaskar : स्वरा अशी काही भडकली की रणवीर शौरीला ट्विटरवर केलं ब्लॉक | पुढारी

swara bhaskar : स्वरा अशी काही भडकली की रणवीर शौरीला ट्विटरवर केलं ब्लॉक

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वरा भास्कर (swara bhaskar) ही बॉलीवूडची अशी अभिनेत्री आहे जी सध्या चालू असलेल्या सामाजिक प्रश्नांवर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करते. पण अलीकडेच अभिनेत्रीने अचानक रणवीर शौरीला ट्विटरवर ब्लॉक केल्याचे कळते. रणवीरकडून आतापर्यंत याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. तसचे स्वराकडूही अद्याप याविशयी प्रतिक्रिया आलेली नाही. पण, जेव्हा रणवीर शौरीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. त्याचबरोबर रणवीरच्या प्रतिक्रियावर ट्विटवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. (swara bhaskar)

रणवीर शौरीने एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यावर लिहिले आहे की, स्वरा भास्करने त्याला ब्लॉक केले आहे. यासोबत त्याने एक रडणारा मजेशीर मीमही शेअर केला आहे. फनी मीम पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. या संदर्भात स्वरा  भास्करकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, तर युजर्सही याबाबत प्रश्न विचारत आहेत, ज्याला रणवीरनेही उत्तर दिले आहे.

रणवीर आणि स्वरा यांनी ‘शेम’ या शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र काम केले आहे हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल. हा चित्रपट २०१९ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका सूडाच्या कथेवर आधारित होता. यात रणवीर आणि स्वरा व्यतिरिक्त सीमा पाहवा, सयानी गुप्ता आणि सायरस साहुकर महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात स्वराने फॅनी या हाऊसकीपिंग स्टाफची भूमिका साकारली होती.

रणवीर शेवटचा सस्पेन्स ड्रामा फिल्म ४२० IPC मध्ये डिसेंबर २०२१ मध्ये झी5 वर दिसला होता. तो सलमान खान आणि कॅतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटातही दिसणार आहे. बार मुंबईकर हा त्याचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि विजय सेतुपती यांच्या भूमिका आहेत. कृपया सांगा की विजय सेतुपती या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button