malaika-arjun : फक्त जॅकेट घालून मलायका अर्जुनसोबत सुट्टीवर | पुढारी

malaika-arjun : फक्त जॅकेट घालून मलायका अर्जुनसोबत सुट्टीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरच्या (malaika-arjun) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेले आहेत. मलायका अर्जुनची ही स्टाईल पाहून अनेकजण कयास लावत आहेत की, दोघंही वाढदिवसाला रोमँटिक मूडमध्ये असतील. बी-टाऊनचे स्टार जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या रोमँटिक बाँडिंग पाहायला मिळाली. दोघंही व्हेकेशनवर जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे कपल आपापल्या कामात कितीही बिझी असू दे पण, कोणत्याही विशेष प्रसंगी ते दोघेही एकमेकांसोबत आनंद साजरा करण्यासाठी वेळ काढतात. मलायका अरोरा पार्ट्यांची किती शौकीन आहे हे सर्वांनाच माहित आहे. आता मलायका अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहे. (malaika-arjun)

यंदाही मलायकाने अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास प्लान केला आहे. अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन कपूरला खासगी सुट्टीवर घेऊन गेली आहे. अशा परिस्थितीत हे स्टार कपल नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. याचदरम्यान अर्जुन मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे.

अर्जुन मलायकाचा लूक

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मलायका अरोरा यावेळी फक्त जॅकेट आणि बूटमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने ब्रँडेड हँडबॅगने त्याचा लूक पूर्ण केला, अर्जुन कपूरबद्दल सांगायचे तर तो कॅज्युअल लूकमध्येही खूपच हँडसम दिसत आहे. यादरम्यान अर्जुन मलायकाची बॉन्डिंग जबरदस्त दिसत आहेत.

अर्जुन कपूर २६ जून रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुन कपूरला त्याचा खास दिवस मलायका अरोरासोबत घालवायचा आहे, यासाठी हे जोडपे खासगी सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. आता अर्जुन मलायकाच्या या खासगी व्हेकेशनच्या रोमँटिक फोटोंची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

VIDEO- instantbollywood वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Back to top button