जेव्हा खासदार सुप्रिया सुळे बनवतात वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी … | पुढारी

जेव्हा खासदार सुप्रिया सुळे बनवतात वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी ...

यवत, पुढारी वृत्तसेवा : राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मात्र तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते. शिवसेना आमदारांनी केलेली बंडखोरी ही राज्यात चर्चेचा विषय बनत असताना महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहे

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुप्रिया सुळे मात्र महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना शनिवारी दुपारी यवत गावातील भैरवनाथ मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जेवण्याच्या सोयीसाठी पिठलं भाकरी करताना व्यस्त असल्याचे दिसून आले आहे

Back to top button