

पुढारी ऑनलाईन : अनेक मरीठी आणि हिंदी मालिंकामध्ये काम केलेली सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर चर्चेत आली आहे. कारण आहे-तिचं हटके फोटोशूट. ऐश्वर्या नारकर हिने केलेला फोटोशूट पाहून तुम्ही म्हणाल वयात काय ठेवलंय?
तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. ऐश्वर्या दिसायला खूप सुंदर आहे. तिचे आजही लाखो फॅन आहेत. तिने साडी आणि व्हाईट कलरच्या शर्टमध्ये फोटोशूट केले आहे.
ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे तोंडभरून कौतुक करणारा एक वेगळा चाहता वर्ग आहे.
अनेक नाटकांमध्ये तिने काम केलंय. अनेक मालिका आणि मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. ऐश्वर्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिने केलेला ग्लॅमरस फोटो पाहून फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.
तिचे काही फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाईट आहेत. काही फोटोंमध्ये तिने व्हाईट कलरचा शर्ट घातलाय. हे पोटो पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
'स्वामिनी' या मालिकेत तिने पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली. तिने 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'श्रीमंता घरची सून', 'दुहेरी','रेशीमगाठी','सोनपावले', 'या सुखांनो या', ','घर की लक्ष्मी बेटीयाँ' , 'ये प्यार ना होगा कम अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय.
बालनाट्यामध्ये साकारलेली पहिली भूमिका होती ती ज्ञानेश्वरांची. तिथून सुरू झाला त्यांचा अभिनयाचा प्रवास. 'गंध निशिगंधाचा', 'मी माझ्या मुलांचा' ही त्यांची सुरुवातीची नाटकं. 'महाश्वेता' मालिकेनं त्यांच्या करिअरला कलाटणी दिली.