कर्वे नगर उड्डाण पूल परिसरात अपघातात दोघे जागीच ठार - पुढारी

कर्वे नगर उड्डाण पूल परिसरात अपघातात दोघे जागीच ठार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कर्वे नगर उड्डाण पूल परिसरात बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघात दोघे जागीच ठार झाले. दुचाकीवर दोघे वारजे माळवाडीकडून कर्वे पुतळ्याकडे जात होते.

यावेळी भरधाव वेगातील दुचाकी कर्वे नगर उड्डाण पूल जवळ स्लिप झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सलीम उस्मान कोकरे, शंकर अंकुश इंगळे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

दरम्यान मागील महिन्यात वानवडी परिसरात देखील दोन दुचाकीस्वराची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र अपघातात जखमी होऊन गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Back to top button