‘छोरी’ थरकाप उडवणाऱ्या सिनेमाची झलक | पुढारी

'छोरी' थरकाप उडवणाऱ्या सिनेमाची झलक

पुढारी ऑनलाईन : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांची आगामी हॉरर मुव्ही – ‘छोरी’ची झलक जगासमोर सादर केली आहे. ‘छोरी’ ची ही झलक थेट ‘भूतिया’ नसली तरीही पाहणाऱ्याचा थरकाप उडवणारी आहे. तिचे सादरीकरण भीतीदायक, पाठीच्या कण्यातून हादरवून टाकणारी सणक जाईल असे आहे. जर तुम्हाला अंगावर काटा आणणारा अनुभव घ्यायची इच्छा असेल, तर मग हा सिनेमा तुमच्यासाठीच असेल.

Chhorii

नुसरत भरुचा

अमेझॉन ओरीजनल मुव्ही प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात धडकी भरवणाऱ्या अनुभवासाठी तयार रहा. कारण आता आणखी वाट पहाणे कठीण आहे! रोमहर्षक सफर घडवणारा भयपट तयार आहे, आणि हे मोशन पोस्टर पाहिल्यावर तुम्ही आज रात्री झोपताना नक्कीच लाईट लावून झोपाल!

चित्रपटाविषयी थोडेसे…

‘छोरी’ हा एक भयपट असून तिचे दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे. भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा हे निर्माते आहेत.

मराठी फिल्म लपाछपीचा हा रिमेक आहे. त्यात मुख्य भूमिकेत नुसरत भरूचा दिसेल. तिच्यासोबत मिता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज झळकणार आहेत.

हा सिनेमा भय आणि असामान्य शक्तींवर आधारित आहे. याकरिता एबंडेंशिया एंटरटेनमेंटच्या ‘साईक’ (हॉरर आणि पॅरानॉर्मल जॉनरवर केंद्रित विभाग) आणि लॉस एंजलिस येथील क्रिप्ट टीव्ही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

क्रिप्ट टीव्हीने द लुक-सी, द बीर्च, सनी फॅमिली कल्ट आणि द थिंग इन द अपार्टमेंट अशा नवीन भय-पटांची निर्मिती केली आहे.

 

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

Back to top button