मनोज पाटील याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये साहिल खानचं नाव | पुढारी

मनोज पाटील याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये साहिल खानचं नाव

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्याने अभिनेता साहिल खानला जबाबदार धरले आहे. सुसाईड नोट ओशिवारा पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने लिहिली आहे. मनोजला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुसाईड नोटमध्ये मनोजने साहिल खानवर छळवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत मनोजने सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट केला आहे.

मनोजवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी रात्री त्याने गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

२९ वर्षीय मनोज पाटील एक प्रोफेशनल फिटनेस, मॉडेल आहे. तो ट्रेनरही आहे. त्याने २०१६ मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशीप जिंकली होती. त्याने वयाच्या २१ वर्षी ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

कोण आहे साहिल खान?

मनोजने ज्याच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे तो साहिल खान देखील फिटनेस ट्रेनर आहे.

साहिल खानने ‘नाचगें सारी रात’ या म्युझिक व्हिडिओमधून करिअरला सुरुवात केली होती. एन. चंद्रा यांच्या स्टाइल चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका केली होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. Xcuse Me मध्येही त्याने काम केले आहे. साहिलने नेगर खान सोबत २००३ मध्ये लग्न केले होते. मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

हे ही वाचा :


Back to top button