web series 2022 : नववर्षात ‘या’ वेब सिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

web series 2022 : नववर्षात ‘या’ वेब सिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नववर्षांचे आनंदात आणि उत्साहात सर्वत्र स्वागत होत आहे. यंदाचे साल २०२२ हे सिने रसिकांना विशेष आनंद देणारा ठरणार आहे. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्व प्रेक्षक ज्या नव्या वेब सिरीजचे वाट पहात आहेत. त्याची मेजवानी या नववर्षात मिळणार आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, सोनी लिव, जी ५ आणि डिझ्नी प्लस हॉटस्टार यांनी आपल्याला गाजलेल्या वेब सिरीजचा ( web series 2022 ) पुढील भाग व आणखी काही नवे सिरीज रसिकांसाठी घेऊन येत आहेत.

मागील २ वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन आणि इतर बंधनांमुळे चित्रपट गृहे बंद व निम्म्या क्षमतेने चालू होती. याचा संपूर्ण फटका चित्रपट व्यवसायाला बसला. सध्या चित्रपट गृहे निम्म्या क्षमतेने चालू झाली आहेत. या काळात काही नवे चित्रपट रसिकांना चित्रपट गृहात पाहण्यास मिळाली. पण पुन्हा कोरोनाचे सावट गडद होऊ लागल्याने लॉकडाऊन शक्यत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या वर्षात प्रदर्शित होणारे सिनेमांनी पुन्हा आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ( web series 2022 )

कोरोना सुरुवात झाल्यावर सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व रसिकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळविला होता. तेव्हा अनेक चित्रपट व वेब सिरीझ ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. प्रेक्षकांनी या वेब सिरीजना लोकांनी अक्षरशा: डोक्यावर घेतले होते. आता नव्या वर्षात या तमाम ओटीटी प्लॅटफॉर्म गाजलेल्या सिरीजचे सिक्वेल येत आहेत. तर काही नवे कोरे सिरीज देखिल चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ( web series 2022 )

  1. रुद्र : द एज ऑफ डार्कनेस
    डिझ्नी प्लस हॉटस्टार वर अजय देवगनची रुद्र ही वेबसिरीज येत आहे. अजय देवगन ‘रुद्र’ च्या माध्यमातून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकत आहे. या सिरीजमध्ये त्याच्या सोबत ईशा देओल सुद्धा पुनरागमन करत आहे. ही सिरीज लुथर सिरीजवर आधारित आहे.
  2. हीरामंडी
    नेटफ्लिक्ससाठी संजय लिला बन्साळी हे ‘हीरामंडी’ वेबसिरीज बनवत आहेत. लवकर ती प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.
  3. ब्रीद
    अमेझॉन प्राइम व्हिडिओ वरील अभिषेक बच्चन, अमित साध आणि नित्या मेनन यांची गाजलेली वेब सिरीज ब्रीदचा पुढचा सीझन येत आहे. सध्या याचे शुटींग सुरु आहे.
  4. पंचायत
    अमेझॉन प्राइम वरील लोकप्रिय पंचायत या सिरीजचा पुढील भाग यंदा रसिकांना पहायला मिळेल. जितेंद्र कुमार हा सध्या वेब सिरीज नवा स्टार मानला जात आहे. त्याच्या कोटा फॅक्टरी या वेब सिरीजने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पंचायत या ग्रामीण भागतल्या गमती जमती असणाऱ्या वेब सिरीजला चांगली लोकप्रियता मिळाली होती.
  5. दिल्ली क्राइम सीजन २
    नेटफ्लिक्स वरील शेफाली शाह हीची दिल्लीतील निर्भया घटनेवर आधारीत दिल्ली क्राइम ही वेब सिरीज खूपच गाजली होती. समिक्षकांनी देखिल या वेब सिरीजला नावाजले होते. शिवाय मागील वर्षातील ती सर्वोत्कृट वेब सिरीज ठरली होती. नेटफ्लिक्स ‘दिल्ली क्राईम’चा पुढील भाग घेऊ येत आहे.

सध्याच्या काळात मनोरंजनचे जग कमालीचे बदलत चालले आहे. प्रेक्षक वेगवेगळी माध्यमांचा मनोरंजनासाठी वापर करत आहे. इंटरनेच्या सुविधेमुळे लोकांचा घरच्या घरी मनोरंजन करुन घेण्याचा कल वाढत आहे. त्यामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीमुळे प्रेक्षक आपोआप ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. त्यामुळे हे ओटीटी प्लॅटफॉर्म देखिल प्रेक्षकांसाठी नव नवे प्रयोग करत आहेत.

 

Back to top button