कुशल बद्रिके- भाऊचा मिश्किल अंदाज, ‘पठ्ठ्याने चक्क केस कापले’ | पुढारी

कुशल बद्रिके- भाऊचा मिश्किल अंदाज, 'पठ्ठ्याने चक्क केस कापले'

पुढारी ऑनलाईन: विनोदाचं अचूक टायमिंग साधत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी म्हणजे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा ‘पांडू’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून तिघांच्या जोडीने धमाल केली आहे. ‘पांडू’ या चित्रपटात भाऊ आणि कुशल यांनी पांडू-महादूची भूमिका साकारली आहे. सध्या पडद्यासोबत चित्रपटाच्या बाहेर देखील दोघांची धमाल मस्ती पाहायला मिळाली आहे.

पांडू-महादूच्या जोडीतील महादू म्हणजे, कुशल बद्रिकेच्या इंन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटबाहेर दोघेजण मैत्रीचा आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतेच कुशलच्या इंन्स्टाग्रामवर पांडूच्या तीन गोष्टीचा न्हिडिओ आणि फोटो शेअर झाला आहे. यातील दोन व्हिडिओत भाऊ आणि कुशल दोघेजण पोलिसांच्या वेशभूषेत दिसत आहेत. तर त्यातील एकामध्ये भाऊ धुण्याचा पाण्यात जमिनीवर झोपलेला असून त्याच्या पायाला दोरीने बांधलेले दिसत आहे.

दुसऱ्या एका व्हिडिओत भाऊ एका तलावाच्या कडेला उभा असून त्याच्या तोडात पाणी भरलेले आहे. यावेळी भाऊला मुद्दामहून कुशल आपल्या हातातील खायला देत असतो. तर यावेळी तोडात पाणी असल्याने भाऊ खायला घेण्यास नकार देतो. यानंतर मात्र, कुशल त्याला पाणीची तोडातून बाहेर चूळ भरण्यास सांगतो. हे ऐकताच भाऊ ताबोडतोब आपल्या तोडातील पाणीची चूळ भरतो. परंतु, कुशल त्याला खायला देण्यास यावेळी नकार देतो. यानंतर मात्र भाऊ चिडतो आणि दोघेजण खळखळून हसायला लागतात.

पहिल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘आमच्या भाऊ कदमला जेवणानंतर झोपायची हौस भारी, पण शूटिंग डेमध्ये फायटिंग सिक्वेन्स असेल तर जेवण जाम महागात पडतं.’ तर दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘तर no sorry, no thanks हा मैत्रीचा rule आहे. पण मैत्रीत “हडं” म्हंटलेल चालत.’ असे लिहिले आहे.

यानंतर कुशलने तिसरी गोष्ट शेअर करताना चक्क भाऊने केस कापल्याचे सांगितले आहे. या फोटोत भाऊ आणि कुशल एका केस कापण्याच्या दुकानात दिसत असून भाऊच्या हातात कात्री दिसते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुशलने ‘गेली अनेक वर्ष मी आणी भाऊ एकत्र प्रवास करतो, पांडूच्या निमित्ताने आम्ही केस ही कापायला सोबत जाऊ लागलो, एकदा भाऊच लवकर आवरलं तर पठ्ठ्याने चक्क माझे केस कापायला धेतले, नशीब !! प्रकरण फक्त फोटोवर निभावलं नाहीतर सिनेमात मी फार भयंकर दिसलो असतो आणि असा, भाऊने माझा “केसाने गळा कापला असता.’ असे लिहिले आहे. यावरून भाऊने कुशलचे केस कापल्याचे निर्दशनास आले आहे. यावेळी कुशल मात्र, चेहऱ्यावर भिती दिसून येत होती.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने ‘हा आणि ते ‘केस’ तरी दिसलं असतं’, ‘देव पावला तुम्हाला’, ‘कलाकारांच्या अंगात खूप कला असतात हे खरं आहे’, ‘कुशल आजकाल तुला फोटोला कॅप्शन द्याला खूप भारी जमते….असे कोणाला जमनारपण नाही…एकदम मस्त..’ ‘उद्या लवकर या कोंढव्यात, वाट बघतोय आम्ही’, ‘तुमचा चेहरावरची भीती दर्शवते की भाऊ काय चीज आहे.’, ‘केसाने केस कापले असते’. असे अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत.

भाऊ आणि कुशलने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर खूपच धमालमस्ती करत आहेत. याशिवाय दोघेजण पहिल्यांदा सोनालीसोबत ‘पांडू’ या चित्रपटात दिसले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button