नितेश राणे अज्ञातवासात नाही, सिंधुदुर्गातच आहेत : नारायण राणे | पुढारी

नितेश राणे अज्ञातवासात नाही, सिंधुदुर्गातच आहेत : नारायण राणे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? नितेश राणेनं कुछ भी हरकतं नही की है! हे सर्व आरोप सूडाच्या भावनेतून केले जात आहेत, असा पलटवार केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

सिंधुदुर्गात झालेल्या राड्यात नितेश राणें का उसमे कोई भी योगदान नही है, असंही राणेंनी सांगितलं. नारायण राणे यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे उत्तर दिलं आहे. कसल्या अटके बद्दल? काय केलं नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून सूडाच्या भावनेतून कारवाई होऊ शकते. केस टाकली? की अटक होणार? हे काही माहीत नाही, असं राणेंनी यावेळी सांगितलं.

नितेश राणे अज्ञातवासात आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. सिंधुदुर्गातच आहेत, ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आमच्यावर सूडाच्या भावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात तर जावं लागणार. अशा रितीने बातम्या येत असतील तर कोर्टात जावं लागेल. सरकारला काय करायचं ते करू द्या. नितेश राणेंनी काहीही केलं नाही. त्यांनी कोणाला मारलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसींचं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही जाऊ शकते अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारलं असता या संबंधी भविष्यवाणी वर्तवणं चुकीचं होईल. जो निर्णय होईल तो ऐकल्यावर मत व्यक्त करणं योग्य होईल, असं त्यांनी सांगितलं. सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून विदर्भाला भरपूर काही द्यायचं आहे. ते देण्यात येईल, असं ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button