Aashka Goradia : आशका गोराडियाने समुद्रात असा केला योगा की... | पुढारी

Aashka Goradia : आशका गोराडियाने समुद्रात असा केला योगा की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशका गोरडिया (Aashka Goradia) गेल्या काही बॉलिवूड झगमटापासून दूर असली तरी ती नेहमी आपले ग्लॅमसर फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय राहत असते. सध्या आशका गोरडिया हिचा योगा करताना एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

नुकतेच आशका गोरडिया (Aashka Goradia)ने आपल्या इन्स्टाग्रामवर एक योगा करताना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती टॉपलेस असून आपल्या डोक्यावर उभी असल्याचे दिसते. तिने हा योगामधील शिर्षासनचा एक प्रकार केला आहे. तिच्या आजुबाजूला समुद्राचा किनारा असून ती यावेळी पाठमारी दिसते.

या योगातील खास म्हणजे. तिने आपल्या डोक्यावर शरीरीचा तोल सांभाळत पायांना एका सरळ रेषेत ठेवले आहे. याच दरम्यान तिने पायांना वेलीसारखा आकार दिला आहे. या फोटोत तिच्या पाठिवर #OneLove असे अक्षरे लिहिलेली दिसून येत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘तुम्हाला सर्वात कमी ओळखणारे लोक तुमच्याबद्दल बोलतात हे खूपच मजेदार आहे. त्यांना असे वाटते की, आम्हाला काही माहितीच नसते. माझे पाय आकाशात तर माझे डोके जमिनीवर आहे आयुष्यभर. माझी पाठ मजबूत आहे, म्हणून बोलणारे, द्वेष करणारे त्यांचे जीवन जगतात आणि आम्ही आमचे जीवन जगतो.’

यावरून आशका नेहमी लोक काय म्हणतील यांचा विचार न करता बेधडक आणि आनंदी जीवन जगत आहे. तर तिने आपल्या सर्व चाहत्यांनाही आनंदी जीवन जगण्याचा यातून सल्ला दिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर होताच चाहत्यांना अनेक कमेट्स केल्या आहेत. यात काहींनी तिला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला सुपर, परिपूर्ण संतुलन, छान संतुलन साधला अशा अनेक कमेंट्स लिहिल्या आहेत. या शिवाय चाहत्यांनी फायर आणि हार्ट ईमोजी शेअर केला आहे.

आशका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट आणि व्यायामाचे फोटो- व्हिडिओ शेअर करत असते. खास करून ती आपल्या पती ब्रेंट गोबलसोबत समुद्राच्या किनाऱ्यावरील योगाचे व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘आपल्या पतीला मिस करत असून लवकर या’ असे लिहिले आहे. आशकाचा पती ब्रेंट गोबल सध्या अमेरिकेत आहे. हा फोटो तिचा सुट्यांचा आनंद घेतानाचा वेळेचा आहे.

आशकाने ‘कुसुम’, ‘बालवीर’, ‘नागिन’ अशा अनेक लोकप्रिय टीव्ही शोजमध्ये दिसली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तिने फिल्मी जगताला अलविदा केला होता. फिटनेसची काळजी घेणारी आशका गोव्यात एका योगा स्कूलची मालकीण आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

Back to top button