Casting Couch : उर्फी जावेदचा इंडस्ट्रीविषयी मोठा खुलासा, म्हणाली-मोठमोठे लोक… | पुढारी

Casting Couch : उर्फी जावेदचा इंडस्ट्रीविषयी मोठा खुलासा, म्हणाली-मोठमोठे लोक...

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) बॉलिवूड इंडस्ट्रीतील कास्टींग काउचविषयी मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या फॅशन स्टेटमेंटवरून चर्चेत राहते. आपल्या बोल्ड फोटोज मुळे ती अनेकदा चर्चेत राहते.  काही दिवसांपूर्वी ती मुस्लिम व्यक्तीशी लग्न न करण्याच्या वक्तव्यावरून चर्चेत आली होती. आता तिने कास्टिंग काउचविषयी धक्कादायक विधान करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. ती म्हणाली, इंडस्ट्रीतील पुरूष शक्तीशाली आहेत. तुम्हाला रिजेक्ट करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.

‘कास्टिंग काउच झेलंलं आहे’

जावेदने एका मुलाखतीत सांगितलं की, अनेक मुलींप्रमाणे मीदेखील कास्टिंग काउच झेलंलं आहे. मला एकदा जबरदस्तीने यामध्ये ओढल गेलं. मी स्वत:ला भाग्यवान समजते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यास यशस्वी ठरले. कुणाचेही नाव न घेता उर्फीने सांगितलं की, तिला इंडस्ट्रीतील काही मोठ्या लोकांकडून कास्टिंग काउची शिकार झाले होते.’

तिने सांगितलं की, ‘मी घरातून पळून मुंबईत आले होते. येथे मला खूप स्ट्रगल करावा लागला. माझ्याकडे न पैसे होते न राहण्यासाठी घर. तेव्हा एका निर्मात्याने मला एक वेब सीरीजची ऑफर दिली. आणि जबरदस्तीने बोल्ड सीन करायला सांगितलं. तेव्हा मी बोल्ड सीन करण्यास नकार दिला. तेव्हा त्याने मला तुरंगात पाठवण्य़ाची धमकी दिली हाेती.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Back to top button