Shahrukh Khan ipl : शाहरुख खान बनू शकतो IPLचा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू!

Shahrukh Khan : शाहरुख खान बनू शकतो IPLचा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू!
Shahrukh Khan : शाहरुख खान बनू शकतो IPLचा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचा स्फोटक फलंदाज शाहरुख खान (shahrukh khan ipl)ने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील धडाकेबाज खेळींच्या जोरावर त्याने आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी आपला दावा मजबूत केला आहे. शाहरुखने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आठ सामन्यांच्या सात डावात ४२.१६ च्या सरासरीने २५३ धावा कुटल्या. यात त्याने दोन अर्धशतकेही ठोकली.

शाहरुख (shahrukh khan ipl) गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळला. मोठे फटके मारण्याच्या क्षमतेमुळे तो प्रसिद्धही झाला. पंजाब संघाने शाहरुखला ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण यंदा त्याला रिटेन करण्यात आलेनाही. दरम्यान,विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील धडाकेबाज खेळीच्या जोरावर त्याला यावेळी आयपीएल २०२२ च्या लिलावात मागच्यावेळी पेक्षा जास्त किंमत मिळू शकतो, असा अंदाज अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.

IPL च्या इतिहासातील पाच सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू

खेळाडू : लिलावाची किंमत (रुपये) : फ्रेंचायझी (वर्ष)

कृष्णप्पा गौतम : 9.25 कोटी : चेन्नई सुपर किंग्स (2021)
क्रुणाल पांड्या : 8.8 कोटी : मुंबई इंडियंस (2018)
पवन नेगी : 8.5 कोटी : दिल्ली कॅपिटल्स (2016)
वरुण चक्रवर्ती : 8.4 कोटी : पंजाब किंग्स (2019)
राइली मेरिडिथ : 8 कोटी : पंजाब किंग्स (2021)

असे आहे तज्ज्ञांचे मत…

आकाश चोप्रा आणि इरफान पठाण सारख्या काही क्रिकेट माजी क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की, शाहरुख खान (shahrukh khan ipl) यावेळी लिलावात सर्वाधिक कमाई करणारा अनकॅप्ड खेळाडू बनू शकतो. अनकॅप्ड म्हणजे असा खेळाडू जो अद्याप राष्ट्रीय संघासाठी खेळलेला नाही. असे झाल्यास तो कृष्णप्पा गौतमला मागे टाकेल.

गौतम सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू..

गौतमला गेल्या वर्षी एका लिलावात चेन्नई सुपर किंग्जने ९.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आणि क्रुणाल पांड्याला मागे टाकत तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला. आता शाहरुख खान या दोघांनाही मागे टाकू शकतो. शाहरुखने (shahrukh khan) विजय हजारे ट्रॉफीपूर्वी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आठ सामन्यांत १५७.८१ च्या स्ट्राइक रेटने १०१ धावा केल्या होत्या.

शाहरुखची गेल्या वर्षभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कामगिरी…

सैयद मुश्ताक अली 2021/22 स्पर्धा  : 8 सामने : 101 धावा  : 33.66  सरासरी  : 157.81 स्ट्राईक रेट
विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धा  : 8 सामने : 253 धावा  : 42.16  सरासरी  : 186.02 स्ट्राईक रेट
आयपीएल 2021 स्पर्धा  : 11 सामने : 153 धावा : 21.86 सरासरी  : 134.21 स्ट्राईक रेट

विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट स्ट्राइक रेट…

विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहरुख खानचा स्ट्राइक रेट 186.02 राहिला, जो स्पर्धेतील चौथा सर्वोच्च आहे. या स्पर्धेत त्याने 19 चौकार आणि 20 षटकार ठोकले. शाहरुखने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अशा अनेक खेळी खेळल्या, ज्यामुळे त्याचा संघ तामिळनाडू स्पधेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला.

अंतिम सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी…

शाहरुख खाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २१ चेंडूत ४२ धावा केल्या. शिवाय त्याच्या नावावर कर्नाटकविरुद्ध ३९ चेंडूत ७९ धावा, मुंबईविरुद्ध ३५ चेंडूत ६६ धावा आणि बंगालविरुद्ध १२ चेंडूत ३२ धावांचा समावेश आहे. या दमदार खेळीमुळे तामिळनाडूला मोठी धावसंख्या उभारता आली. यावेळी आयपीएल २०२२ मेगा लिलाव बंगळूरमध्ये होत आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूच्या शाहरुखची सर्वोच्च खेळी

32 धावा : 12 चेंडू : 266.66 स्ट्राइक रेट : विरुद्ध संघ बंगाल : 2चौकार, 3 षटकार
79* धावा : 39 चेंडू : 202.56 स्ट्राइक रेट : विरुद्ध संघ कर्नाटक : 7 चौकार, 6 षटकार
42 धावा : 21 चेंडू : 200 स्ट्राइक रेट : विरुद्ध संघ हिमाचल प्रदेश : 3 चौकार, 3 षटकार
66 धावा : 35 चेंडू : 188.57 स्ट्राइक रेट : विरुद्ध संघ मुंबई : 6 चौकार, 5 षटकार

चेन्नई सुपर किंग्जलाही शाहरुखमध्ये रस…

शाहरुख खानने अनेक फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेतले आहे. सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान, शाहरुखची इनिंग पाहताना धोनीही त्याला भेटला होता. धोनीच्या जागी चेन्नईला मॅच फिनिशरची गरज भासणार आहे. शाहरुखची खेळी पाहता तो या भूमिकेत फिट बसेल असे अनेकांनी भाकित केले आहे.

आयपीएलमध्ये १३६ च्या स्ट्राईक रेटने धावा…

आयपीएलमध्ये आतापर्यंत ५० टी-20 सामन्यांमध्ये १३६.४० च्या सरासरीने ५४७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३८ चौकार आणि ३३ षटकारांचा समावेश होता. याशिवाय दोन विकेट्सही घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये शाहरुखने ११ सामन्यांत १३४.२१ च्या स्ट्राईक रेटने १५३ धावा केल्या आहेत. यामध्ये नऊ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news