

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टी सिरीज म्युझिक कंपनीचे एमडी भूषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. भूषण कुमार यांनी आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तिने तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबईतील डीएननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक वाचा
आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून भूषण यांनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी नेवून बलात्कार केला. २०१७ पासून ते २०२० पर्यंत असे तीन वर्षे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे.
अधिक वाचा
फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात भूषण कुमार व त्यांच्या टीमकडून कोणताही खुलासा केलेला नाही.
अधिक वाचा
यापूर्वीही झाले होते आरोप
यापूर्वी 'मीटू' चळवळीच्या माध्यमातून मॉडेल मरीना कुंवर हिने भूषण कुमार यांच्यावर शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते.
हेही वाचलंत का?
पाहा :"ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…" | हेमांगी कवी