अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; कुटुंबियांची संपत्ती जप्त | पुढारी

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; कुटुंबियांची संपत्ती जप्त

मुंबई; पुढारी ऑनलाईन :  अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुख यांना अटक होण्याची शक्याताही गडद झाली आहे.

अधिक वाचा 

अनिल देशमुख यांनी ईडीच्या गेल्या तीन सुनावणीला उपस्थिती नोंदवली नव्हती. त्यानंतर ईडीने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुमारे ४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

अनिल देशमुखांवर मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत १०० कोटी रुपये खंडणी गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हा आरोप माजी मुंबई पोलिस प्रमुख परमबीर सिंह यांनी केला होता.

परमबीर सिहांच्या या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

हा तपास ईडीकडे गेल्यानंतर ईडीने या प्रकरणी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना समन्स पाठवला होता.

अधिक वाचा 

या प्रकरणी ऋषिकेश आणि त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण या दोघांनीही चौकशीला जाणे टाळले आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यांच्या वकिलांनी ईडीने केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगितले.

या प्रकरणी देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.

Back to top button