kashibai bajirao ballal : जाणून घ्या, बालकलाकार आरोही पटेलविषयी
पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर काशीबाई बाजीराव बल्लाळ (kashibai bajirao ballal ) नावाची मालिका सध्या सुरू आहे. हा नवा शो पेशवा बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. (kashibai bajirao ballal ) या मालिकेत काशीबाई यांची कहाणी दाखवलं जातंय. तुम्हाला माहितीये का, या मालिकेत काशीबाईंच्या भूमिकेतील बालकलाकार कोण आहे? ही बालकलाकार आहे आरोही पटेल. तिची या मालिकेत महत्त्वाची भूमिका आहे. ती काशीबाईंची भूमिका साकारतेय.
या मालिकेमध्ये काशीबाई यांचे समर्पित राहणं, त्याग, धाडस दाखवलं जाणार आहे.
या मालिकेत बालकलाकार आरोही पटेल आणि व्यंकटेश पांडे यांच्या भूमिका आहेत. पांडेने बाजीरावची भूमिका साकारलीय. आरोही पटेल नवोदित अभिनेत्री आहे. ती डीआयडी लिटिल मास्टर्सची माजी स्पर्धक आहे.
या मालिकेत सुरभी गौतम, अनमोल बावडेकर, दर्श प्रजापति, हिर्वा त्रिवेदी, संजना वर्मा, अमीष शर्मा, हेतल यादव, आरव खोट, नेंसी मकवाला आणि तरुण खन्ना यासारखे कलाकार आहेत.
९ वर्षांची आहे आरोही
आरोही पटेल ९ वर्षांची आहे. तिने पहिल्याच लुक टेस्टमध्ये निर्मात्यांची मने जिंकली होती. पेशवा बाजीराव यांची भूमिका साकारणारा व्यंकटेश पांडे (Venkatesh Pandey) , डीआयडी लिटिल मास्टर्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काशीबाईंच्या भूमिकेसाठी घोडेस्वारी
आरोही पटेल म्हणाली होती ''जेव्हा मला सांगण्यात आलं की, मी काशीबाई बाजीराव बल्लाळमध्ये मुख्य भूमिकेत असेन. तेव्हा मी खूप होते. ही माझी पहिलीच मालिका आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहासातील इतकी प्रतिष्ठित भूमिका साकारण्यासाठी खूपचं उत्साहित आहे. माझ्या टीमने काशीबाईच्या भूमिकेसाठी माझी खूप मदत केली आणि माझी काळजीदेखील घेतली. मी एका सीनसाठी घोडेस्वारीदेखील शिकलीय."
कोण आहे व्यंकटेश पांडे?
या मालिकेत व्यंकटेश पांडे हे बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. व्यंकटेश पांडे म्हणाला, ''मी महान योध्दा बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. खूप महत्वाची भूमिका मला साकारायला मिळतीय याचा मला अभिमान आहे .

