

पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सध्या सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केलेल्या चौकशीमुळे चर्चेत आली आहे. मागील १२ वर्ष जॅकलिन बॉलीवूडमध्ये सक्रीय आहे. हिट चित्रपटांपेक्षा तिच्या फ्लॉप चित्रपटांची यादीच लांबलचक आहे. तिचे ९ चित्रपट 'फ्लॉप' झाले आहेत. तरीही तिच्या नावावर तब्बल ७४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
२०० कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश असल्याने तिला देशाबाहेर जाण्यापासून थांबवण्यात आले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हरी प्रकरणाचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये आलिशान गाड्या, घोडे आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने ८ डिसेंबर रोजी तिची चौकशी केली.
मूळची श्रीलंकन नागरिक असणार्या जॅकलिनने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने टीव्ही रिपोर्टर म्हणूनही काम केले. २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धा जिंकत मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले.
मूळची श्रीलंकन नागरिक असणार्या जॅकलिनने २००९मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपट होता अलादीन. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर तिने अनेक जुडवा २, हाउसफूव २. बागी २. मिसेज सीरियल किलर आदी चित्रपटात काम केले.तिचा शेवटचा चित्रपट हा भूत पुलिस हा होता. यामध्ये तिने सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम बरोबर स्क्रीन शेअर केली. तसेच अनेक ख्यातनाम ब्रँण्डच्या जाहिरातीमध्ये मॉडल म्हणूनही तिेने काम केले आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार, जॅकलिनची एकूण संपत्ती ही १० मिलियन डॉलर ( 74 कोटी रुपये ) इतकी आहे. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. २०१९ मध्ये तिचे वार्षिक उत्पन्न ९.५ कोटी रुपये इतके होते. विशेष म्हणजे, त्यावर्षी नेटफिक्सवर तिचा ड्राइव्ह या एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला होता.
अभिनय व्यवसायाबरोबरच श्रीलंकेतील कोलंबो येथे जॅकलिन रेस्टारंट व्यवसायही चालवते. तिचे मुंबईत स्वत:चे घर आहे. तसेच श्रीलंकेतील एक बेट तिच्या नावावर आहे. या बेटावर ती रेस्टॉरंट चालवते.
२०० कोटींच्या वसुली प्रकरणातील सूत्रधार सुकेश चंदशेखर याने जॅकलिनला ५३ लाखांचा घोडा तर ९ लाख रुपयाचं पार्शियन माजंर भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.