ऋतुजा- विशाल फाले थिरकणार ‘जीव रंगलया’ | पुढारी

ऋतुजा- विशाल फाले थिरकणार 'जीव रंगलया'

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि विशाल फाले यांचा ‘जीव रंगलया’ हे नवे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्यात पती- पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘सेवन सिझ मोशन पिक्चर’ निर्मित ‘जीव रंगलया’ हे गाणे चाहत्यांच्या भेटीस आले आहे. या गाण्यात अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि विशाल फाले याच्या मुख्य भूमिका आहेत. गाण्यात लग्नानंतरची पती- पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असते ते दाखविले आहे.

या गाण्यात नवीन लग्न करून आलेल्या जोडप्याचा गृहप्रवेश आणि त्याच्यात फुलणारे प्रेम दाखवले आहे. त्यांच्या या गाण्याचे पोस्टर चाहत्यांच्या भेटीस आले असून यात ऋतुजा आणि विशाल रोमँटिक माहोलमध्ये पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या टिझरला ही चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून या टिझरने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे.

‘जीव रंगलया’ गाण्याच्या पोस्टरमध्ये या दोघांची जोडी अगदी खुलून दिसत असून बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. या गाण्यात पती- पत्नीच्या लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक यांचे खूप सुंदर वर्णन पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित हे गाणे असून गाण्याचे बोल आणि गाण्याच्या निर्मिती समीर परब यांनी केली आहे.

ओंकारने आजपर्यंत २० दिग्दर्शित केलेल्या गाण्यांचा पल्ला गाठला आहे. या रोमँटिक गाण्याला संगीत प्रितेश कामत यांनी दिले असून गायक भूषण गोसावी यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केले आहे. या गाण्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी शशिकांत सिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली.

प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री घेऊन ‘जीव रंगलया’ हे रोमँटिक गाणे चाहत्यांच्या दिलावर राज्य करण्यास तयार झाले. गाण्याच्या पोस्टरने गाण्याची उत्सुकता आणखीच वाढवून ठेवली आहे. शिवाय या गाण्यात एका नव्या अंदाजात ऋतुजा आणि विशालला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button