हाताला फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये पोहोचली ऐश्वर्या राय, नजरा खिळल्या तिच्यावरच! | पुढारी

हाताला फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये पोहोचली ऐश्वर्या राय, नजरा खिळल्या तिच्यावरच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय बच्चनने ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू चालवली. तिच्या निळ्या डोळ्यांनी उपस्थितांना मोहात पाडलं. कान्स २०२४ मधून तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऐश्वर्या रायने रेड कार्पेटवर धांसू एन्ट्री घेतली. तिच्या लूकवर प्रत्येकाच्या नजरा खिळल्या. एका हाताला फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याने रेड कार्पेटवर फुल आत्मविश्वासाने उतरली.

ऐश्वर्याच्या लूकमध्ये वेगळेपण काय?

कान्स फिल्म्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनने मोनोक्रोमॅटिक लूक निवडलं. तिने ब्लॅक मोनोक्रोमॅटिक ड्रेस व्हाईट श्रगसोबत पेअर केलं. तिच्या ड्रेसवर गोल्डन एम्बेलिशमेंट्स दिसले. ड्रेसमध्ये मागच्या बाजू लॉन्ग लेन्थ एक ट्रेल आहे. ज्यावर गोल्डन डिझाईन आहे.ऐश्वर्या राय बच्चनने मेकअप मिनिमल ठेवलं आणि खूप कमी एक्सेसरीजसोबत लूक कंप्लीट केलं. गोल्डन कलरच्या मोठ्या लूप्सने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली.

ऐश्वर्या बद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी

  • ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब आपल्या नावे केला होता
  • ऐश्वर्या अशी पहिली भारतीय अभिनेत्री आहे, जिचा मेणाचा पुतळा मादाम तुसादमध्ये आहे
  • ऐश्वर्या अशी पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे, जी ओपरा विनफ्रेच्या अमेरिकन शोमध्ये सहभागी होती
  • २००५ मध्ये ऐश्वर्याशी प्रेरित बार्बी डॉलची एक लिमिटेड रेंज ब्रिटेनमध्ये रिलीज करण्यात आली होती
  • २००३ मध्ये आयोजित कान फिल्म फेस्टव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अशी पहिली महिला ज्युरी मेंबर होती, जी सिनेजगतातून आली होती

कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा

गेल्या २२ वर्षांपासून, ऐश्वर्या राय बच्चन सतत कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग बनत आहे आणि प्रत्येक वेळी ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये १४ मे रोजी ७७ वा वार्षिक कान चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. हा कार्यक्रम २५ मे पर्यंत चालणार आहे.

हाताला फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्या कान्समध्ये का सहभागी झाली?

ऐश्वर्या राय बच्चन बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली. ती मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई विमानतळावर दिसली. एका हाताला फ्रॅक्चर असल्याने मुलगी आराध्या तिच्यासोबत दिसली. ऐश्वर्या राय बच्चनने २००२ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यांदाच, ती सुंदर साडी नेसलेली दिसली आणि तिने या कार्यक्रमात प्रसिद्धी मिळवली.

नव्या चित्रपटाची फॅन्सना प्रतीक्षा

ऐश्वर्या राय ‘पोन्नियिन सेल्वन २’ मध्ये दिसली होती. तिने चियान विक्रम आणि जयम रवि यासारख्या स्टार्ससोबत काम केलं होतं. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक केले. ‘पोन्नियिन सेल्वन २’चे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं होतं. आता फॅन्स तिच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

Back to top button