Boeing Starliner launch | सुनीता विल्यम्स तिसऱ्या अंतराळ यात्रेसाठी सज्ज, आज रात्री ‘स्टारलाइनर’ झेपावणार

Boeing’s Starliner Launch
Boeing’s Starliner Launch

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहे. ती आज रात्री 10 वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून निघालेल्या बोईंगच्या स्टारलाइनर यानातून अंतराळात जाणार आहे. याआधी ७ मे रोजी ऑक्सिजन व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या यानाचे उड्डाण थांबवण्यात आले होते. आज (दि.१ मे) पुन्हा नासाकडून 'या' मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सुनीता विल्यम्स १ आठवडा अंतराळात थांबणार

अमेरिकेची स्पेस एजन्सी NASA ने सांगितले आहे की, "जर सर्व काही ठीक झाले तर, स्टारलाइनर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स त्यांचा सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत 'स्टारलाइनर' अंतराळयान आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील."

सुनीता तिसऱ्यांदा अवकाशात झेपावणार

भारतीय वंशाच्या अमेरिकन अवकाश शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत. यासह तिला नवीन स्पेस शटलच्या पहिल्या क्रू मिशनवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून इतिहास रचण्याची संधी आहे, अशी देखील नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने मोहिमेविषयी माहिती दिली आहे.

'अंतराळात पोहोचन, तेव्हा घरी परतल्यासारखे वाटेल'; सुनीता

नासाच्या या मोहिमेवर प्रतिक्रिया देताना, सुनीता म्हणाल्या, मी थोडी घाबरलेली आहे; पण नवीन अंतराळ यानात उड्डाण करण्यास उत्सुक आहे. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेन, तेव्हा मला पुन्हा घरी परतल्यासारखे वाटेल" अशी भावनिक प्रतिक्रिया देखील सुनीता यांनी दिली. ५९ वर्षीय सुनिता यांनी नासाच्या अभियंत्यांना स्टारलाइनर अंतराळयान डिझाइन करण्यातही मदत केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news