Web Series : डिसेंबरमध्ये ओटीटीवर फक्त आणि फक्त एंटरटेन्मेंट!

डिसेंबर महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार या वेबसीरीज
डिसेंबर महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार या वेबसीरीज
Published on
Updated on

2021 हे वर्ष अखेरच्या महिन्यात पोहोचले आहे. अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे अनिवार्य साधन बनले आहे. (Web Series) डिसेंबर महिना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. अनेक मोठे आणि बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेबसीरिज या महिन्यात रीलिज होत आहेत. त्यावर एक नजर..(Web Series)

लॉस्ट इन स्पेस सीझन  : नेटफ्लिक्सवरील सायफाय वेबसीरिज 'लॉस्ट इन स्पेस'चा तिसरा आणि अंतिम सीझन 1 डिसेंबरला येत आहे. दर्शकांसाठी ही एक रोमांचक सफर असणार आहे. 1965 मध्ये आलेल्या याच नावाच्या टीव्ही सीरिजचा ही वेबसीरिज रीमेक आहे. यात 2046 सालातील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

मनी हाईस्ट-5 व्हॉल्यूम  : नेटफ्लिक्सची बहुचर्चित सीरिज 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या सीझनमधील व्हॉल्यूम 2 म्हणजेच अखेरचा भाग 3 डिसेंबर रोजी स्ट्रीम होत आहे. टोकियोच्या मृत्यूनंतर प्रोफेसर आणि त्याच्या साथीदारांचे काय होणार याची उत्सुकता दर्शकांना आहे.

कोबाल्ट ब्लू : नेटफ्लिक्सवर 'कोबाल्ट ब्लू' हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेता प्रतीक बब्बरची यात मुख्य भूमिका आहे. यात एका भाऊ-बहिणीला प्रतीकच्या कॅरेक्टरवर प्रेम होते, असे कथानक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे. कुंडलकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

अ‍ॅलेक्स रायटर : सोनी लिव्हवर अ‍ॅलेक्स रायटर या स्पाय सीरिजचा दुसरा सीझन 4 डिसेंबरपासून येत आहे. पॉईंट ब्लँक मिशन फत्ते केल्यानंतर अ‍ॅलेक्स भूतकाळ विसरून नवी सुरुवात करत आहे. पण एका मित्राच्या कुटुंंबावर झालेला हल्ला त्याला पुन्हा त्याच्या जुन्या कामात परतण्यास भाग पाडतो.

द एक्सपेन्स : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर सायफाय सीरिज 'द एक्सपेन्स'चा सहावा सीझन 10 डिसेंबरपासून येत आहे. ही एक भविष्यवेधी सीरिज आहे. यात सूर्यमालेत वसवण्यात आलेल्या विविध कॉलन्यांमध्ये माणूस राहात असल्याचे दाखवले आहे.

इनसाईड एज सीझन 3 : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'इनसाईड एज' या वेबसीरिजचा तिसरा सीझन 3 डिसेंबर रोजी रीलिज होत आहे. क्रिकेट या खेळातील अनेक काळे कारनामे उघड करणारी ही सीरिज आहे. यात विवेक ओबेरॉय, रिचा चड्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कातिल हसिना के नाम : झी फाईव्हवर 10 डिसेंबरपासून 'कातिल हसिनाओं के नाम' ही पाकिस्तानी वेबसीरिज येत आहे. ही एक अँथॉलॉजी सीरिज असून महिला कॅरेक्टरच्या द़ृष्टिकोनातून यातील कथा उलगडल्या आहेत. याचे दिग्दर्शन ब्रिटिश-भारतीय मीनू गौर हिने केले आहे.

420 आयपीसी : विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन विनोद याची प्रमुख भूमिका असलेला '420 आयपीसी' हा चित्रपट झी फाईव्हवर 17 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. आर्थिक गुन्ह्यावर आधारित हा कोर्टरूम ड्रामा आहे. रोहनने 2018 च्या 'बाजार'मधून पदार्पण केले होते. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी 'सेक्शन 375'चे लेखन केले होते.

द व्हीसल ब्लोअर : मध्य प्रदेशात गाजलेल्या व्यापम् घोटाळ्यावर आधारित 'द व्हीसल ब्लोअर' ही सीरिज सोेनी लिव्हवर 17 डिसेंबरपासून येत आहे. रित्विक भौमिक, सोनाली कुलकर्णी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. रित्विकने यापूर्वी 'बंदिश बँडिटस्' सीरिज चर्चेची ठरली होती.

द विचद : अभिनेता हेन्र्री केविल याची मुख्य भूमिका असेलली 'द विचर' या अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर फँटसी थ्रिलर सीरिजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर 17 डिसेंबरपासून येत आहे.

इतर सीरिज आणि चित्रपट :  अभिषेक बच्चन अभिनित आणि दिया अन्नपूर्णा घोष दिग्दर्शित 'बॉब बिस्वास' हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी झी फाईव्हवर येत आहे. नेटफ्लिक्सवर 8 डिसेंबरपासून सुपरहिरो सीरिज 'टायटन्स'चा तिसरा सीझन येत आहे. आर. माधवन आणि सुरवीन चावला यांची 'डीकपल्ड' ही सीरिज 17 डिसेंबरपासून; तर रॉमकॉम सीरिज 'एमिली इन पॅरिस'चा दुसरा सीझन 22 डिसेंबरपासून येणार आहे. अभिनेत्री रविना टंडनची गूढ, थ्रिलर वेबसीरिज 'अरण्यक' 10 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर येत आहे. रविना यात पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत आहे. डिस्नी प्लस हॉटस्टारवर 10 डिसेंबरपासून अभिनेत्री सुश्मिता सेनच्या 'आर्या' या सीरिजचा दुसरा सीझन स्ट्रीम होत आहे. तसेच अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा 'अतरंगी रे' हा चित्रपट 24 डिसेंबरपासून डिस्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news