बीडब्ल्यूएफ जागतिक टूर फायनल्स आजपासून - पुढारी

बीडब्ल्यूएफ जागतिक टूर फायनल्स आजपासून

बाली : वृत्तसंस्था :  सलग तीन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पी. व्ही. सिंधू बुधवारपासून सुरू होणार्‍या बीडब्ल्यूएफ जागतिक टूर फायनल्समध्ये जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर, युवा लक्ष्य सेन आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीकडेदेखील सर्वांच्या नजरा असतील.

भारताच्या सात खेळाडूंनी वर्षातील शेवटच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. मिश्र दुहेरी सोडून भारत सर्व गटांत आपले आव्हान उपस्थित करेल. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीत खेळतील. आतापर्यंत किताब जिंकणारी एकमात्र भारतीय सिंधू गेल्या वर्षी फायनलमध्ये पोहोचली होती.

तिचा पहिला सामना थायलंडच्या चोचुवोंगशी होईल. ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू टोकियो ऑलिम्पिकनंतर गेल्या तीन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. एका वर्षात चार सुपर सीरिज जेतेपद मिळवणारा श्रीकांतदेखील चांगल्या फॉर्मात आहे. त्याने इंडोनेशिया मास्टर्स व हाइलो ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. 2014 मध्ये तो या स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचला होता.

पहिल्यांदा स्पर्धेत सहभाग नोंदविणार्‍या लक्ष्य आणि चिराग व सात्विक जोडीला कठीण गट मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या फेरीत पोहोचणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. लक्ष्य सेनला ‘अ’ गटात अव्वल मानांकित डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेन, दोन वेळचा जागतिक चॅम्पियन जपानचा केंतो मोमोता आणि डेन्मार्कचा रास्मस गेमके सोबत ठेवण्यात आले आहे.

लक्ष्यचा पहिला सामना गेमकेशी असेल. तसेच जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या सात्विक व चिराग जोडीचा सामना इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नाल्डी गाइडोन आणि केवन संजया सुकामुजोशी होणार

Back to top button