barbados republic : ब्रिटनच्या राणीला दूर सारत बार्बाडोसने स्विकारली लोकशाही | पुढारी

barbados republic : ब्रिटनच्या राणीला दूर सारत बार्बाडोसने स्विकारली लोकशाही

लंडन; पुढारी ऑनलाईन : barbados republic : बार्बाडोस या देशाने ४०० वर्षांनंतर ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिला देशाच्या राजेपदावरून हटवत स्वतःच्या राष्ट्राध्यक्षाची नियुक्ती केली आहे. हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स स्वतः उपस्थित होते. सँड्रा मॅसन यांनी बार्बाडोसच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. आपण पूर्ण सार्वभौम राष्ट्र बनलो आहोत, असं त्यांनी भाषणात सांगितलं.

प्रिन्स चार्ल्स barbados republic यांनी त्यांच्या भाषणात बार्बाडोसमध्ये भूतकाळात असलेल्या गुलामगिरीच्या प्रथेचा उल्लेख इतिहासातील काळा डाग असा केला. “मला जेव्हा या कार्यक्रमासाठी बोलवलं, तेव्हा मी भावूक झालो,” असे ते म्हणाले.

बार्बाडोसने barbados republic राजेशाहीचा त्याग करून लोकशाही स्वीकारण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला. त्यानंतर १० लोकांची समिती नेमण्यात आली आणि अल्पावधित बार्बाडोसने लोकशाही स्वीकारली.  ब्रिटनची राणी आजही जगातील १५ देशांची प्रमुख आहे. या देशांतही राजेशाहीचा त्याग करून लोकशाही स्वीकारण्याचा चळवळींना गती येईल.

बार्बाडोसने barbados republic राणीला राजपदावरून हटवताना ब्रिटन आणि ब्रिटनचे राजघराणे यांच्याशी संबंध चांगले कसे राहू शकतात, हे दाखवून दिलं आहे.

गणतंत्र दिनाच्या समारोहास सोमवारी मध्यरात्रीनंतर प्रारंभ झाला. या समारोहाचे आयोजन तेथील लोकप्रिय चौकात करण्यात आले, जेथून गेल्या वर्षी एका ब्रिटीश लॉर्डची प्रतिमा हटविण्यात आली होती.

बार्बाडोसने लोकशाहीचा स्विकार केल्यानंतर गणतंत्र दिनाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्रभर आकाशात मोठी आतषबाजी करण्यात आली. अनेक ठिकाणी मोठ मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. जेणे करुन संपूर्ण देशवासी या एैतिहासिक घटनेचे साक्षीदार बनतील. यावेळी अनेक कलाकारांसह ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रामचे ऑनलाईन प्रसारण करण्यात आले. जेणे करुन अमेरिका, कॅनडा तसेच इतर देशात राहणारे बार्बाडोसचे नागरिक हा सोहळा हा क्षणांचा आनंद घेऊ शकतील.

एक लोकतांत्रिक देश बनण्याची प्रक्रिया बार्बाडोसमध्ये गेल्या दोन दशाकांपासून चालू होती. ३० नोव्हेबर रोजी या प्रयत्नास मृतरुप आले. येथील संसदेद्वारा मागील महिन्यात दोन तृतिअंश बहुमताने बार्बाडोसने आपला पहिला राष्ट्रपती निवडला.

Back to top button